Pre Wedding Shoot | प्री-वेडिंग शूटसाठी ‘ही’ आहेत सर्वोत्तम ठिकाण

Pre Wedding Shoot | टीम कृषिनामा: आजकाल प्री-वेडिंग शूटचा ट्रेंड खूप वाढला आहे. सोशल मीडियामुळे आणि चित्रपटामुळे लोकप्रिय प्री-वेडिंग शूटकडे आकर्षित होत चालले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून लोक प्री-वेडिंग शूट करतात. आजकाल प्रत्येक जोडप्याला प्री-वेडिंग शूट करायचे असते. तुम्ही पण जर प्री-वेडिंग शूट करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भारतातील सर्वोत्तम प्री-वेडिंग डेस्टिनेशनबद्दल माहिती सांगणार आहोत. प्री-वेडिंग शूट करण्यासाठी तुम्ही पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

लवासा (Lavasa For Pre Wedding Shoot)

प्री-वेडिंग शूट करण्यासाठी लवासा हे एक परफेक्ट ठिकाण आहे. पश्चिम घाटामध्ये वसलेले लवासा शहर मुंबईपासून 180 किमी आणि पुण्यापासून 50 किमी अंतरावर आहे. लवासा हे शहर 25,000 एकरमध्ये पसरलेले आहे. या ठिकाणी प्री-वेडिंग शूट करण्यासाठी अनेक जागा आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी प्री-वेडिंग शूट करण्याचा प्लॅन बनवू शकतात.

सोनमर्ग (Sonmarg For Pre Wedding Shoot)

पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग हे ठिकाण प्री-वेडिंग शूटसाठी एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने प्री-वेडिंग शूट, हनिमून इत्यादी गोष्टींसाठी येतात. सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेले हे शहर प्री-वेडिंगसाठी परफेक्ट डेस्टिनेशन मानले जाते. या ठिकाणी तुम्ही बर्फामध्ये सर्वोत्तम प्री-वेडिंग शूट करू शकतात.

जयपुर (Jaypur For Pre Wedding Shoot)

तुम्हाला जर ऐतिहासिक ठिकाणी प्री-वेडिंग शूट करायचे असेल, तर जयपुर तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. जयपूर हे शहर पिंक सिटी म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी तुम्ही हवा महालासमोर शूट करू शकतात. त्याचबरोबर जयपूरमध्ये तुम्ही राजवाड्यांसमोर आणि तलावासमोर प्री-वेडिंग शूटचा आनंद घेऊ शकतात.

खंडाळा (Khandala For Pre Wedding Shoot)

तुम्ही जर निसर्गाच्या सानिध्यात प्री-वेडिंग फोटोशूट करण्याचा विचार करत असाल, तर खंडाळा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचे सर्वोत्तम नजारे बघायला मिळतील. इथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सुंदर फोटोशूट करू शकतात. खंडाळामध्ये फोटोशूट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रिसॉर्ट उपलब्ध आहेत.