Hair Fall | ‘या’ गोष्टी थांबवू शकतात केस गळती, जाणून घ्या

Hair Fall | टीम कृषीनामा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खराब आहाराच्या सवयींमुळे केस गळतीची समस्या वाढत चालली आहे. प्रत्येक दुसरा व्यक्ती या समस्येपासून त्रस्त आहे. केस गळती थांबवण्यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे उत्पादन वापरतात. पण ही उत्पादन केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. या उपायांमुळे केसांना कुठल्याही प्रकारचे हानी होत नाही. केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही पुढील घरगुती उपाय करू शकतात.

कोरफड (Aloevera-For Hair Fall)

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. कोरफड केसांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. कोरफडीच्या मदतीने केसांच्या वाढीस चालला तर मिळतेच पण त्याचबरोबर केस गळती थांबते. यासाठी तुम्हाला केसांना कोरफडीचा गर साधारण 30 मिनिटे लावून ठेवावे लागेल. तीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस कोमट पाण्याने धुवावे लागते. नियमित कोरफडीचा गर केसांना लावल्याने केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

कांद्याचा रस (Onion juice-For Hair Fall)

केसांच्या समस्यांवर मात करण्यासाठी कांद्याचा रस फायदेशीर ठरू शकतो. त्याचबरोबर केस गळतीची समस्या थांबवण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त ठरू शकतो. कांद्यामध्ये आढळणारे सल्फर केस गळती कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं कांद्याचा रस केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस कोमट पाण्याने धुवावे लागतील. नियमित कांद्याचा रस केसांना लावल्याने केस निरोगी राहू शकतात.

ग्रीन टी (Green tea-For Hair Fall)

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे केसांची वाढ होण्यास आणि केस गळती थांबवण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला ग्रीन टी बनवून तो थंड करून त्यानंतर तो केसांना लावावा लागेल. तुम्हाला  ग्रीन टी तासभर केसांवर ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस थंड पाण्याने धुवावे लागतील.

केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही वरील घरगुती उपायांचा वापर करू शकतात. त्याचबरोबर स्किन केअर रुटीनमध्ये ग्रीन कॉफीचा समावेश केल्याने त्वचेला पुढील अनोखे फायदे मिळू शकतात.

त्वचा चमकदार होते (The skin becomes shiny-Skin Care Green Coffee)

ग्रीन कॉफीच्या मदतीने त्वचेवरील चमक वाढू शकते. त्याचबरोबर ग्रीन कॉफीचे नियमित सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा निरोगी होते. त्वचेवरील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही ग्रीन कॉफीचा फेस मास्कप्रमाणे देखील वापर करू शकतात. ग्रीन कॉफीचा फेस मास्क वापरल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते.

सुरकुत्या कमी होतात (Wrinkles are reduced-Skin Care Green Coffee)

ग्रीन कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या समस्यांपासून वाचवतात. त्यामुळे तुम्ही जर चेहऱ्यावरील सुरकुत्यांच्या समस्येपासून त्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या आहारात ग्रीन कॉफीचा समावेश करू शकतात. ग्रीन कॉफीच्या मदतीने त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Dark Elbow | हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी वापरा ‘या’ आयुर्वेदिक पद्धती

Amla and Curd | दही आणि आवळ्याच्या मदतीने केसांच्या ‘या’ समस्या होऊ शकतात दूर

Green Coffee | स्किन केअर रुटीनमध्ये करा ग्रीन कॉफीचा समावेश, मिळतील ‘हे’ अनोखे फायदे

Buttermilk and Jaggery | ताकासोबत गुळाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Cucumber Benefits | त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यासोबतच काकडी खाल्ल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे