बराच वेळ पाय दुमडून बसल्यास किंवा एकाच स्थितीत बराच वेळ झोपल्यामुळे पाय किंवा हात सुन्न होतात, त्यांना मुंग्या येतात. परंतु, हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हे कोणत्यातरी त्रासाचे लक्षण आहे. पण हाता-पायांना मुंग्या का येतात? याचे कारण जाणून घेऊयात…
- खूप वेळ टायपिंग केल्याने तुमच्या मनगटाच्या नसा आकुंचित होतात व त्यामुळे हाताला मुंग्या येतात. फिजिओथेरपी आणि व्यायामाने Carpal tunnel syndrome चा त्रास दूर होण्यास मदत होईल.
- मानेची नस आखडली गेल्यास पाठीपासून पायापर्यंत किंवा मानेपासून हातापर्यंतच्या भागात मुंग्या येतात किंवा तो भाग दुखतो. चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे किंवा एखाद्या दुखापतीमुळे मानेची नस आखडली जाते.
- तुमच्यात व्हिटॅमिन बी 12ची कमतरता आहे. त्यामुळे तुम्हाला थकलेले किंवा आळसवाणे वाटेल.
- रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण शरीरातील नसांसाठी विषारी ठरते व त्यामुळे हातापायांना मुंग्या येतात. मुंग्या येण्याबरोबरच तुम्हाला खूप भूक किंवा तहान लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- थायरॉईड ग्रंथी निष्क्रीय असल्यास थकवा जाणवू लागतो, वजन वाढू लागते. त्याचबरोबर हातापायाला मुंग्या येतात. म्हणून हायपरथायरॉईसम आहे की नाही? हे पाहण्यासाठी ब्लड टेस्ट करून घेणे योग्य ठरेल.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
- उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
- आता जून महिन्यात केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता
- चांगली बातमी – सलग दहाव्या दिवशी देशातील नवीन रूग्णसंख्या ३ लाखांहून कमी…