Dark Elbow | टीम कृषीनामा: केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर हाताचे कोपरे आणि गुडघ्यांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. कारण कोपऱ्याचा आणि गुडघ्याचा काळेपणा खूप वाईट दिसतो. त्यामुळे हा काळेपणा दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असतात. यामध्ये बहुतांश लोक महागडे क्रीम आणि लोशन वापरतात. पण पैसे न खर्च करता देखील तुम्ही या समस्येपासून सुटका मिळू शकतात. हाताच्या कोपर्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही पुढील आयुर्वेदिक पद्धतींचा वापर करू शकतात.
लिंबाचा रस (Lemon juice-For Dark Elbow)
कोपऱ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो. लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड आढळून येते, जे त्वचेचा काळेपणा दूर करण्यास मदत करते. तुम्हाला हातांच्या कोपऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे लिंबाचा रस लावून ठेवावा लागेल. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्हाला तुमच्या हाताचे कोपरे स्वच्छ पाण्याने धुवावे लागतील. आठवड्यातून दोन ते तीन वेळा लिंबाचा रस लावल्याने कोपऱ्याचा काळेपणा दूर होऊ शकतो.
खोबरेल तेल (Coconut oil-For Dark Elbow)
खोबरेल तेल त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते. त्याचबरोबर खोबरेल तेलाच्या मदतीने कोपऱ्याचा काळेपणा देखील दूर होऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोपऱ्यावर खोबरेल तेल लावून काही मिनिटं मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला खोबरेल तेल एक तास कोपऱ्यावर लावून ठेवावे लागेल. असे केल्याने कोपऱ्याचा काळेपणा हळूहळू दूर व्हायला लागतो.
कोरफड (Aloevera-For Dark Elbow)
कोरफड देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडीमध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटिफंगल गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेचा काळेपणा दूर करण्यास मदत करतात. तुम्हाला कोपऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी कोरफडीचा गर किंवा बाजारात उपलब्ध असलेले एलोवेरा जेल कोपऱ्यांवर लावावे लागेल. नियमित कोरफडीचा वापर केल्याने कोपऱ्याचा काळेपणा हळूहळू कमी व्हायला लागतो.
हाताच्या कोपऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही वरील पद्धतींचा वापर करू शकतात. त्याचबरोबर स्क्रीन केअर रुटीनमध्ये ग्रीन टीचा समावेश केल्याने तुम्हाला पुढील फायदे मिळू शकतात.
त्वचा चमकदार होते (The skin becomes shiny-Skin Care Green Coffee)
ग्रीन कॉफीच्या मदतीने त्वचेवरील चमक वाढू शकते. त्याचबरोबर ग्रीन कॉफीचे नियमित सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा निरोगी होते. त्वचेवरील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही ग्रीन कॉफीचा फेस मास्कप्रमाणे देखील वापर करू शकतात. ग्रीन कॉफीचा फेस मास्क वापरल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते.
सुरकुत्या कमी होतात (Wrinkles are reduced-Skin Care Green Coffee)
ग्रीन कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या समस्यांपासून वाचवतात. त्यामुळे तुम्ही जर चेहऱ्यावरील सुरकुत्यांच्या समस्येपासून त्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या आहारात ग्रीन कॉफीचा समावेश करू शकतात. ग्रीन कॉफीच्या मदतीने त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होऊ शकतात.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या