Vitamin C | शरीरातील ‘विटामिन सी’ची कमतरता भरून काढायची असेल, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

Vitamin C | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा आला की, अनेक आरोग्याशी (Health) संबंधित समस्या निर्माण व्हायला लागतात. हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे शरीराला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्याचबरोबर हिवाळा आपल्या त्वचेसाठी देखील खूप त्रासदायक असतो. हिवाळ्यामध्ये त्वचेवर कोरडेपणा येणे, खाज येणे, टाचांना भेगा पडणे इत्यादी समस्या उद्भवतात. त्याचबरोबर या ऋतूमध्ये केसांच्या देखील समस्या निर्माण व्हायला लागतात. आपल्याला असे वाटते की, या सगळ्या समस्या बदलत्या  वातावरणामुळे होत आहेत. पण या समस्या बदलत्या ऋतूसोबत शरीरात विटामिन सी (Vitamin C) ची कमतरता असल्यास निर्माण होऊ लागतात. त्यामुळे आज आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला विटामिन सी ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे याबद्दल माहिती सांगणार आहोत.

संत्रा

हिवाळ्यामध्ये बाजारात सहज उपलब्ध होणारा संत्रा विटामिन सी चा एक उत्तम स्रोत मानला जातो. हिवाळ्यामध्ये नियमित संत्राच्या सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्याचबरोबर संत्र्याचे सेवन केल्याने त्वचा आणि केस देखील निरोगी राहू शकतात. कोलेस्ट्रॉल रक्तदाब आणि रक्तातील साखरेची समस्या कमी करण्यासाठी देखील संत्रा मदत करू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात नियमित संत्राचे सेवन केल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. हिवाळ्यात संत्राचे सेवन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, संत्रा हा थंड असल्यामुळे एका दिवसात एकापेक्षा जास्त संत्र्याची सेवन करू नये.

अननस

अननसामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळते. त्यामुळे नियमित अननसाचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील विटामिन सी ची कमतरता भरून निघू शकते. त्याचबरोबर अननसाचे नियमित सेवन केल्याने तुम्ही ताप, डोकेदुखी, सर्दी, खोकला इत्यादी आजारांपासून देखील दूर राहू शकतात. त्याचबरोबर अननसामध्ये कॅन्सर विरोधी आणि मधुमेहाविरोधी लढणारे गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे अननसाचे नियमित सेवन करणे कॅन्सर आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

पपई

पपई त्वचा आणि पोटासाठी खूप चांगली वाढण्यासाठी. पपईमध्ये विटामिन सी व्यतिरिक्त अँटी इम्प्लिमेंटरी आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे नियमित पपईचे सेवन केल्याने तुमचा चेहरा आणि हाता-पायावरची सूज कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर पपईच्या नियमित सेवनाने पचनाशी संबंधित समस्या कमी होऊ शकतता.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या