अंडी का खावीत ? जाणून घ्या फायदे

आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

बोगस बियाण्यांबाबत आलेल्या तक्रारींवर कारवाई करताना मुळावरच घाव घालावा – अजित पवार

अंड्यामुळे हाडांची मजबुती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. अंड्यामध्ये सल्फर हा उष्ण घटक असतो. त्यामुळे ज्यांना आम्लपित्ता त्रास आहे त्यांनी मात्र आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच अंडे खावे.

भाजलेले चणे खाण्याचे असेही फायदे , वाचून तुम्ही थक्क व्हाल !

  • अंडी खाण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज 3 अंडी खाल्ल्याने आरोग्यासंबंधीच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात.
  • रोज अंडी खाल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते.
  • रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास डोकेदुखी, अशक्तपणा यासारखे आजार सतावत असतात. अंडी खाल्ल्याने हे आजार दूर होतात.
  • अंडी खाल्याने रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी राहाते.
  • अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फायदा होतो.
  • नियमित अंडी खाल्याने हाडं बळकट होतात.
  • अंडी खाल्याने नखं आणि केसांना फायदा होतो.अड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
  • अंडी खाल्याने नखं आणि केसांना फायदा होतो.
  • अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम आणि प्रथिने असतात.

महत्वाच्या बातम्या –

खतांची साठेमारी करून शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास कारवाई करणार – कृषी विभाग

मराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीसंदर्भात राज्य शासन सकारात्मक – अशोक चव्हाण