Winter Health Care | हिवाळ्यामध्ये तिळाचे तेल खाल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Winter Health Care | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये (Winter) आपल्याला आपल्या आरोग्याची (Health) अधिक काळजी (Care) घ्यावी लागते. कारण हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे आपल्या आरोग्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये सर्दी, खोकला आणि मोसमी आजारांचा समावेश आहे. अशा परिस्थितीमध्ये हिवाळ्यात तिळाच्या तेलाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर आयुर्वेदानुसार हिवाळ्यामध्ये तिळाचे तेल सेवन करण्यासाठी सर्वोत्तम कालावधी असतो. बदलत्या वातावरणामध्ये तिळाचे तेल खाणे अनेक समस्यांवर फायदेशीर ठरू शकते. वाढत्या थंडीपासून वाचवण्यासाठी प्राचीन काळापासून तिळाचे सेवन केले जाते. तिळामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, विटामिन डी, विटामिन ई, फॉस्फरस या सारखे पोषक घटक आढळतात. तिळाच्या तेलाच्या सेवनाने श्वास आणि फुप्फुसंशी संबंधित आजारांना आराम मिळू शकतो. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये नियमित तिळाच्या तेलाचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

हृदय

हिवाळ्यामध्ये नियमित तिळाच्या तेलाचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी होऊ शकतो. कारण यामध्ये हृदयाला निरोगी ठेवणारे अँटि-ऑक्सिडेंट आणि अँटी-इम्प्लिमेंटरी गुणधर्म आढळतात. त्याचबरोबर नियमित तिळाचे सेवन केल्याने शरीरामध्ये चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते.

हाडे

हिवाळ्यामध्ये नियमित तिळाचे तेल खाल्ल्याने हाडे मजबूत आणि सुदृढ राहू शकतात. कारण तिळाच्या तेलामध्ये आयरन आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. हे गुणधर्म हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर तिळाच्या तेलाच्या सेवनाने सांधे सूज आणि सांधेदुखीच्या समस्येवर देखील महत्व होऊ शकते.

रक्तदाब

तुम्ही जर उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल, तर हिवाळ्यामध्ये तिळाच्या तेलाचे सेवन करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण या तेलामध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम उपलब्ध असते. जे रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर भाज्या बनवण्यासाठी किंवा इतर खाद्यपदार्थांमध्ये सहज करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या