रोज तुळशीची पाने दुधात उकळवून पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….

तुळस  ही लॅमीएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आ शिया]], युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची (Tulsi) झुडपे आढळतात.हिंदू धर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवाच्या स्थानी मानून पुजा केली जाते. तुळशीच्या घरात असण्याने फक्त सकारात्मक उर्जाच प्राप्त होत नाही, तर ब-याच आजारांपासून आपल्याला सुटका देखील मिळते. तसेच आयुर्वेदामध्येही गुणकारी तुळशीचे मोठे योगदान आहे.

आपल्याला रोगामध्ये किंवा आजारी पडल्यावर तुळशीची पाने कशी वापरायची हे माहीत आहे. पण तुम्हाला माहिती आहे काय, तुळशीची पाने रोज दुधात उकळवून पिल्यास या मोठ्या आजारांपासून सहज मुक्तता मिळते. चला तर मग जाणून घेण्यात की काय फायदे आहेत…..

  • जर एखाद्या व्यक्तीला मूतखड्याचा त्रास असेल तर त्याने रिकाम्या पोटात नियमितपणे तुळशीचे दूध प्यावे. असे केल्याने मूत्रपिंडातील मूतखड्याची समस्या दूर होतेच, शिवाय वेदना दूर होतात.
  • तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांच्या असल्यामुळे ते शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. याशिवाय तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टीरियल आणि अँटीवायरल गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला सर्दी, खोकला आणि सर्दीपासून दूर ठेवता येते.
  • तुळशीच्या पानांमध्ये उपचार करण्याचे गुणधर्म असतात. जर आपण तणाव, नैराश्यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर दररोज हे दूध प्या. डोकं शांत ठेवण्यासाठी याला गार करून पिणे फायदेशीर ठरेल. हे दूध मानसिक तणाव आणि चिंता कमी करण्यात मदत करत.
  • जर डोके खूप दुखत असेल तर तुळस आणि एक चिमूटभर हळद दुधात प्यायल्यास आराम मिळतो. जर कोणाला काही दिवसांनी सतत डोकेदुखी होऊ लागली असेल तर त्याने दररोज सकाळी तुळशी आणि दूध प्यावे. यामुळे त्या व्यक्तीला आराम मिळेल आणि लवकरच मायग्रेनसारखा आजार देखील दूर होईल.
  • श्वासोच्छवासाची समस्या, दमा यासारख्या आजाराने तुम्हाला त्रास होत असेल तर तुळशीची पाने दुधात उकळवून घ्या. असे केल्याने दम्याचा रुग्णांना या फायदा होईल. श्वास घेण्याचा त्रासही कमी होतो.

महत्वाच्या बातम्या –