हा दोन शत्रूंना देखील एकत्र आणणार पेय . चहाला कोणीही नाही म्हणत नाही. चहाचे अनेक प्रकार आहेत. ग्रीन टी , ब्लॅक टी. आपण नेहमी एका प्रकारचा चहा पितो . पण वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचे वेगवेगळे फायदे देखील आहेत. ब्लॅक टी चे फायदे जाणून घेतले तर तुम्ही थक्क होताल.
त्वचेचा रंग गोरा होण्यासाठी काळा चहामध्ये कापसाच्या बोळा भिजवून त्वचेवर लावा. यामुळे त्वचेचा रंग तर गोरा होतोच शिवाय त्वचेची चमकदेखील वाढते.
- ब्लॅक टी बॅग्ज डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांभोवतालची डार्क सर्कल्स दूर होण्यास मदत होईल.
- काळा चहा चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स दूर होऊन चेहऱ्यावरील काळे डागही नाहिसे होतात.
- शेविंग झाल्यानंतर काळा चहा आफ्टर शेवप्रमाणे लावल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात.
- यात फ्लोराइड असल्याने दात मजबूत होण्यास मदत होते.
- ब्लॅक टीच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढते ज्यामुळे संक्रमणापासून बचाव होतो आणि सर्दी, पडसे सारखे आजार होत नाहीत.
- ब्लॅक टीमध्ये पोटॅशियम असल्याने हार्ट प्रॉब्लेम्स दूर होतात.
- ब्लॅक टीमध्ये अॅणटीआॅक्सिडेंट्स असल्याने त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.
- ब्लॅक टीच्या सेवनाने ब्लड शूगर लेवल नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहापासून बचाव होतो.
- शिवाय या चहामधील अँटीआॅक्सीडेंट्स न्यूट्रिएंट्स अनेक ब्यूटी प्रॉब्लम दूर करतात. यासाठी दूध न टाकता पिलेला चहा जास्त फायदेशीर ठरतो तसेच यासोबतच साखरेऐवजी मध टाकल्याने आरोग्याला फायदा होईल असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या –