गुलाब हे नाव आपल्याला प्रेम, उबदारपणा(Warmth) आणि सकारात्मकतेच्या(Of positivity) भावनांची आठवण करून देते. गुलाब बहुतेकदा प्रेम आणि मैत्रीचे प्रतीक म्हणून दिले जाते.
जरी या फुलाच्या सौंदर्याची जगभरात प्रशंसा केली जाते. गुलाबाचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यदायक फायदे हि आहेत.
जमीन अश्या पद्धतीची असावी…(The land should be like this …)
गुलाब हे पीक एकदा लागवड केल्यानंतर त्याच जमिनीत ते ५-६ वर्षे राहते हे पीक वर्षानुवर्षे(Year after year) येत राहते. त्यामुळे शेतीतील लागवडीसाठी योग्य जमीन निवडावी. गुलाब हे पीक सातत्याने येते गुलाबाची मुळे आडवी जास्त पसरतात . त्यामुळे जमीन हि ४०-४५ सेंमी खोलीची निवडावी. अतिशय हलकी जमीन असणे किंवा अत्यंत भारी जमिन असणे हे गुलाबासाठी अयोग्य आहे.
गुलाब पीक घेण्यासाठी असे असावे हवामान…(The climate for growing roses should be …)
पिकाच्या वाढीसाठी आणि चांगल्यापद्धतीने(In a good way) भरण्यासाठी १५-३० अंश से. तापमान असावे लागते. गुलाब भारण्यासाठी हिवाळी हंगाम हा उत्तम असतो. नोव्हेंबर-फेब्रुवारी या कालावधीत उत्तम प्रतीची भरपूर गुलाबाची फुले मिळतात. उत्तम प्रतीच्या फुलासाठी रात्रीचे तापमान १४-१६ अंश से. असे असावे लागते. उन्हाळ्यात (एप्रिल ते जुलै ) उष्ण व कोरड्या हवेमुळे गुलाबाची वाढ खुंटते, बहर कमी येताना आपल्यला दिसते गुलाबाची गुणवत्ताही चांगली नसते..पावसाळी हवामानातील ढगाळ वातावरणामुळे झाडाची वाढ व फुलांच्या गुणवत्तेस हानी होते.
ह्या जातींची असते मागणी…(These breeds are in demand …)
हवामानात आणि जमिनीत चांगली वाढणारी, आकर्षक, मोठे असणारी गुलाब विविध रंगी व सुवासिक फुले असणारी आणि दर्जेदार फुलांचे उत्पादन देणारी जात(A species that produces flowers) निवडावी. बाजारात मुख्यत्वे करून ग्लॅडिएटर, रक्तगंधा, अर्जुन, सुपरस्टार, लेडी एक्स, पापा मिलन, ब्लू मून, डबल डिलाइट, पॅराडाइज, ख्रिश्चन डायर, ओक्लोहोमा, अमेरिका हेरिटेज, लॅडोस, पीस इत्यादी जातींना मागणी असते.
लागवडीचा हंगाम हा असावा..(This should be the planting season.)
गुलाबाची लागवड वर्षभरता केव्हा हि करता येते तरी मुख्यतः पावसाळी हंगामातील लागवड हि उत्तम व यशश्वी होते. लागवडीसाठी उन्हाळ्यात खत-मातीने खड्डे/चर भरून पावसाळ्याच्या सुरवातीला जून-जुलै महिन्यात लागवड करावी. जेथे पाऊस जास्त आहे अशा ठिकाणी ऑक्टोबर किंवा फेब्रुवारीत लागवड करावी.
पाण्याचे व्यवस्थापन ह्या पद्धतीने करावे…(Water management should be done in this way …)
गुलाबाच्या कलमांची सुरवातीच्या काळात काळजी घ्यावी. पाण्याचा जास्त ताण पडू देऊ नये तसेच कलम रुजेपर्यंत थोडे-थोडे वारंवार पाणी द्यावे. नंतर मात्र आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. गुलाबाला ठिबक सिंचन केल्यास अति उत्तम व प्रभावी ठरते.
काढणी व उत्पादन ह्या पद्धतीने घ्यावे…(Harvesting and production should be done in this way …)
आपल्या जवळच्या बाजारपेठेसाठी फुले किंचित उमलू लागल्यावर फुलांची काढणी करावी. काढणी केल्यानंतर जे दांडे असतील ते पाण्यात राहतील इतके पाणी बादलीत असावे. काढणी झाल्यावर काढलेल्या दांड्यांना खालून पुन्हा २ सेंमी अंतरावर कट घ्यावा. फुले लगेच बाजारपेठेत पाठवावयाची नसतील तर ४-६ अंश से. तापमानाला ६-१२ तास शीतगृहात साठवावीत. प्रत्येक झाडापासून पहिल्या वर्षी सरासरी २०-२५, दुसऱ्या वर्षी ३०-३५, तर तिसऱ्या वर्षापासून ५०-६५ फुलांचे उत्पादन मिळते.
महत्वाच्या बातम्या –
- पीएम किसान सम्मान निधीची रक्कम वाढणार? अर्थसंकल्पात नरेंद्र मोदी मोठा
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये 22 आणि 23 जानेवारीला अवका
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘या’ जिल्ह्यातील विकास कामांचे कौतु
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागा
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर, पाणीपट्टीच्या