Negative Calories | ‘हे’ निगेटिव्ह कॅलरीज असलेले पदार्थ वजन कमी करण्यासाठी करतील मदत

Negative Calories | टीम कृषीनामा: जे लोक वजन कमी करण्याचा विचार करतात ते दिवसातील प्रत्येक कॅलरीचा हिशोब ठेवतात. कारण वजन कमी करण्यासाठी कॅलरीजचे नियंत्रणात सेवन करणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे लोक कमीत कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांच्या शोधात असतात. जर तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीज असलेले पदार्थ शोधत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात निगेटिव्ह कॅलरीज असलेल्या पदार्थांचा समावेश करू शकतात. निगेटिव्ह कॅलरीज असलेल्या पदार्थांमध्ये पाणी, सायबर आणि ग्लायसेमिक जास्त प्रमाणात आढळून येते. त्याचबरोबर या पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही पुढील निगेटिव्ह कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करू शकतात.

काकडी (Cucumber-Negative Calories Food)

काकडे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. काकडीमध्ये मिनरल्स, विटामिन्स आणि इलेक्ट्रोलाइट्स आढळून येतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. 100 ग्राम काकडीमध्ये फक्त 15 ते 30 कॅलरी आढळून येतात. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात काकडीचा समावेश करू शकतात.

ब्रोकोली (Broccoli-Negative Calories Food)

ब्रोकोली हे एक सुपर फूड आहे. ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटिऑक्सिडंट आढळून येतात, जे शरीरातील मेटाबोलिझम वाढवण्यास मदत करतात. 100 ग्राम ब्रोकोलीमध्ये फक्त 30 ते 40 कॅलरीज आढळून येतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली फायदेशीर ठरू शकते.

टोमॅटो (Tomato-Negative Calories Food)

टोमॅटोचा वापर जवळपास प्रत्येक भारतीय घरामध्ये केला जातो. टोमॅटोमध्ये विटामिन सी फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळून येते, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. 100 ग्राम टोमॅटोमध्ये 10 ते 15 कॅलरीज आढळून येतात ज्या वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही वरील निगेटिव्ह कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील आयरनयुक्त फळांचा समावेश करू शकतात.

टरबूज (Watermelon-Iron-Rich Fruits)

टरबूज आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, प्रोटीन आणि विटामिन सी आढळून येते. त्याचबरोबर टरबुजाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि शरीर निरोगी राहते. त्यामुळे आयरनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात टरबुजाचा समावेश करू शकतात.

डाळिंब (Pomegranate-Iron-Rich Fruits)

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम, जस्त, आणि आयरन आढळून येते. त्यामुळे डाळिंबाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. डाळिंबाचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात डाळिंबाचा समावेश करू शकतात.

अननस (Pineapple-Iron-Rich Fruits)

निरोगी राहण्यासाठी अननस उपयुक्त ठरू शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, सोडियम, विटामिन सी आणि आयरन आढळून येते. अननसाचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. त्याचबरोबर या फळाचा आहारात समावेश केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते आणि थकवा दूर होण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Glycerine | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी ग्लिसरीनसोबत ‘या’ गोष्टींचा करा वापर

Hair Growth | केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी करा ‘या’ सोप्या टिप्स फॉलो

PM Kisan Yojana | खुशखबर! शेतकऱ्यांना आज ‘या’ वेळी मिळणार पीएम किसान योजनेतील तेरावा हप्ता

Ayurvedic Tips | आंघोळीनंतर त्वचेला खाज सुटू लागल्यावर करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Iron-Rich Fruits | निरोगी राहण्यासाठी आहारात करा ‘या’ आयरनयुक्त फळांचा समावेश