Ashwagandha | त्वचेची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेण्यासाठी अश्वगंधाचा ‘या’ प्रकारे करा वापर

Ashwagandha | टीम कृषीनामा: आजकाल वातावरण, प्रदूषण आणि पोषक आहाराच्या अभावामुळे त्वचेला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे उत्पादन वापरतात. पण ही उत्पादन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही अश्वगंधाचा वापर करू शकतात. अश्वगंधाचा वापर केल्याने त्वचेला नैसर्गिक चमक मिळू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा अश्वगंधा पावडरमध्ये अर्धा कप कच्चे दूध आणि एक चमचा मध मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेला पुढील फायदे मिळू शकतात.

त्वचेवरील काळेपणा दूर होतो (Darkness on the skin is removed-Ashwagandha For Skin Care)

अश्वगंधाच्या फेसपॅकने त्वचेवरील काळेपणा सहज दूर होऊ शकतो. अश्वगंधामध्ये आढळणारे अँटीबॅक्टरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करतात. या फेसपॅकचा नियमित वापर केल्याने त्वचेवरील काळेपणा दूर होतो आणि त्वचेवरील चमक वाढते.

त्वचेवरील चमक वाढते (Increases skin radiance-Ashwagandha For Skin Care)

अश्वगंधा फेस पॅकच्या मदतीने त्वचेवरील चमक वाढू शकते. अश्वगंधा त्वचेतील कोलेजन वाढवण्याचे काम करते. त्याचबरोबर त्वचेवरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे दूर करण्यासाठी तुम्ही अश्वगंधा फेस पॅकचा वापर करू शकतात.

त्वचा हायड्रेट राहते (Skin stays hydrated-Ashwagandha For Skin Care)

अश्वगंधाचा वापर करून तुम्ही त्वचेला हायड्रेट ठेवू शकतात. अश्वगंधा त्वचेमध्ये हायलूरोनन तयार करण्यास मदत करतात, जे तुमच्या त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवतात. परिणामी त्वचा हायड्रेट राहते.

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने अश्वगंधाचा वापर करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही ग्लिसरीनचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.

लिंबाचा रस आणि ग्लिसरीन (Lemon juice and Glycerine-For Skin Care)

चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन आणि लिंबाच्या रसाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला पाच ते सहा थेंब ग्लिसरीनमध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला ते चेहऱ्यावर स्प्रे बॉटलच्या मदतीने स्प्रे करावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग दूर होतात आणि काळेपणाही कमी होतो.

मुलतानी माती आणि ग्लिसरीन (Multani Mati and Glycerine-For Skin Care)

ग्लिसरीन आणि मुलतानी मातीच्या मदतीने चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होऊ शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे मुलतानी मातीमध्ये आवश्यकतेनुसार ग्लिसरीन आणि गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पाच मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या वापराने त्वचेवरील तेलकटपणा सहज दूर होऊ शकतो.

गुलाब जल आणि ग्लिसरीन (Rose water and Glycerine-For Skin Care)

चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन आणि गुलाबजलचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला दोन-तीन चमचे गुलाब जलमध्ये ग्लिसरीनचे तीन ते चार थेंब मिसळून घ्यावे लागेल. नंतर कापसाच्या मदतीने तुम्हाला हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावावे लागेल. साधारण अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा मुलायम, कोमल आणि सुंदर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Negative Calories | ‘हे’ निगेटिव्ह कॅलरीज असलेले पदार्थ वजन कमी करण्यासाठी करतील मदत

Glycerine | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी ग्लिसरीनसोबत ‘या’ गोष्टींचा करा वापर

Hair Growth | केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी करा ‘या’ सोप्या टिप्स फॉलो

PM Kisan Yojana | खुशखबर! शेतकऱ्यांना आज ‘या’ वेळी मिळणार पीएम किसान योजनेतील तेरावा हप्ता

Ayurvedic Tips | आंघोळीनंतर त्वचेला खाज सुटू लागल्यावर करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय