Hing Water | टीम कृषीनामा: हिंग आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हिंगामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि फायबर आढळून येते, जे पचनसंस्थेशी संबंधित समस्या सहज दूर करते. हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. हे पाणी प्यायल्याने अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या सहज दूर होतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये दीड टीस्पून हिंग पावडर मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे पाणी घोटून घ्यावे लागेल. या पेयाचे सेवन केल्याने तुम्हाला आरोग्याचे पुढील आरोग्य फायदे मिळू शकतात.
पचनासाठी फायदेशीर (Good for digestion-Hing Water Benefits)
हिंगाचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर या पाण्याचे सेवन केल्याने पचनशक्ती मजबूत होऊ शकते. हिंगाच्या सेवनाने बद्धकोष्टता, ऍसिडिटी, गॅस, अपचन यासारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात. त्याचबरोबर या पाण्याचे सेवन केल्याने पोट निरोगी राहण्यास मदत होते.
वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Hing Water Benefits)
तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर हिंगाचे पाणी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हिंगामध्ये आढळणारे गुणधर्म वजन कमी करण्यासोबतच पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हिंगाचे पाणी उपयुक्त ठरू शकते.
डोकेदुखीसाठी फायदेशीर (Beneficial for headaches-Hing Water Benefits)
हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने डोकेदुखी कमी होऊ शकते आणि शरीरही निरोगी राहते. तुम्ही जर मायग्रेनच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात हिंगाच्या पाण्याचा समावेश केला पाहिजे. हिंगाच्या पाण्यामध्ये अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी करतात. त्यामुळे हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने डोकेदुखी कमी होऊ शकते.
हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील निगेटिव्ह कॅलरीज असलेल्या पदार्थांचा समावेश करू शकतात.
काकडी (Cucumber-Negative Calories Food)
काकडे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. काकडीमध्ये मिनरल्स, विटामिन्स आणि इलेक्ट्रोलाइट्स आढळून येतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. 100 ग्राम काकडीमध्ये फक्त 15 ते 30 कॅलरी आढळून येतात. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात काकडीचा समावेश करू शकतात.
ब्रोकोली (Broccoli-Negative Calories Food)
ब्रोकोली हे एक सुपर फूड आहे. ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटिऑक्सिडंट आढळून येतात, जे शरीरातील मेटाबोलिझम वाढवण्यास मदत करतात. 100 ग्राम ब्रोकोलीमध्ये फक्त 30 ते 40 कॅलरीज आढळून येतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली फायदेशीर ठरू शकते.
टोमॅटो (Tomato-Negative Calories Food)
टोमॅटोचा वापर जवळपास प्रत्येक भारतीय घरामध्ये केला जातो. टोमॅटोमध्ये विटामिन सी फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळून येते, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. 100 ग्राम टोमॅटोमध्ये 10 ते 15 कॅलरीज आढळून येतात ज्या वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या