धक्कादायक! इस्त्रायलमध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू

नवी-दिल्ली :   जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. यातच आता इस्त्रायलने या चिंतेत भर टाकली असून इस्त्रायलमध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दक्षिणेकडील शहर बेर्शेबा येथील सोरोका रुग्णालयात दाखल ६० वर्षीय व्यक्तीचा सोमवारी(२० डिसें.) मृत्यू झाला. तसेच रुग्णाला इतर व्याधीही असल्याचे सांगितले जात आहे. परंतु यासंदर्भात सविस्तर माहिती अद्यापही मिळालेली नाही.

दरम्यान, ओमायक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यू होताच इस्त्रायलने देशातून बाहेर येणारी-जाणारी हवाई वाहतूक थांबवली आहे. यासंदर्भात बोलतांना इस्त्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी वृद्ध नागरिक तसेच गंभीर आजारांचा सामना करत असलेल्यांसाठी चौथ्या बूस्टर डोसला मंजुरी देण्यासंबंधी आपण विचार करत असल्याचे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –