राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; आतापर्यंत आढळले ‘इतके’ रुग्ण

मुंबई –  कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. भारतात एकाच दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे,

देशात ओमायक्रॉन जवळपास 1270 रुग्ण आढळले आहेत.  यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात , दिल्लीत आहे, महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली  असून महाराष्ट्रातात ४५० रुग्ण आढळलून आले आहे.

ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या जवळपास 1270 जवळ पोहोचली आहे. 22 राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. महाराष्ट्रात 450, दिल्लीत 320 आणि गुजरातमध्ये 97, राजस्थानमध्ये 69, तेलंगणामध्ये 62, तामिळनाडूमध्ये 46, कर्नाटकमध्ये 34, आंध्र प्रदेशमध्ये 16 रुग्ण आढळले आहेत.

महत्वाच्या बातम्या –