अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामासह खरीप हंगामातील तूर पिकाचे नुकसान

अमरावती मध्ये गुरुवारी पहाटे सर्वदूर झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामासह खरीप हंगामातील तूर पिकाचेही मोठे नुकसान केले आहे. चांदूर बाजार, तिवसा, चांदूर रेल्वे या तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. या पावसामुळे संत्रा बागांनाही मोठा फटका बसला आहे.दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतातील कापूस मातीमोल झाला असून संत्र्याच्या मृग बहाराची हानी झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिकूल हवामानामुळे कांद्याची लागवड देखील रखडली आहे.

ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर बोंडअळीची लागण

काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे खरिपातील तूर, कपाशी आणि रब्बीमधील गहू, हरभरा, कांदा, कपाशी सह तूर पिकांचे मोठे नुकसान झाले. उपविभागीय महसूल अधिकारी नरेंद्र फुलझले, तहसीलदार वैभव फरतारे, मंडळ आधी. नंदू मदापुरे, तलाठय़ाने तालुक्यातील शेंदूरजना बाजार, निंभोरा, उंबरखेड, येथील नुकसानीची पडताळणी केली.

हिवाळ्यामध्ये गरमऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करा

याशिवाय आखतवाडा वरखेड, मोझरी, तालुक्यातील ४ महसूल मंडळात अधिकची गारपीट झाल्याने शेतातील उभी पिके सपाट झाली आहेत. काढणीला आलेल्या तूर कपाशी पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला. हरभरा पिकाला पाणी जास्त होत असल्याने तेही धोक्यात आले आहे. हवामान विभागाने पाच जानेवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. सातरगाव, दोपोरी, वरुड, करजगाव, जावरा, फत्तेपूर ,वणी ममदापूर या गावामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले.