मुंबई – यंदा २०२१-२२ मध्ये राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १८२ साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात ६ डिसेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १८२ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ९१ खासगी व या मध्ये राज्यातील ९१ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. तर राज्यात ६ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल २६३.२४ लाख टन उसाचे गाळप तयार करण्यात आले आहे.
राज्यात ६ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल २४३.९३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.२७ टक्के इतका आहे.
राज्यात ६ डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वाधिक ४३ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरु झाले आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, राज्यात ६ डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल ६२.७६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ५३.१४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर उतारा ८.४७ टक्के आहे.
राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात ६८.४१ लाख टन उसाचे गाळप तयार. ६ डिसेंबर २०२१ पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ७२.१९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे, कोल्हापूर जिल्ह्यात साखर उतारा १०.५५ टक्के इतका आहे. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादनही कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे.
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंतप्रधान किसान योजनेचा 10 वा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
- एकही गरजू व्यक्ती बेघर राहता कामा नये; यादीतून वगळलेल्या लाभार्थ्यांनाही घरकुले मिळण्यासाठी प्रयत्न करा – यशोमती ठाकूर
- मोठी बातमी – ‘ही’ योजना राहणार २०२४ पर्यंत सुरु
- त्वचेवर खाज येते असेल तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय!
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. ८ डिसेंबर २०२१