मुंबई – कोरोना (corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona) रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत.
राज्यातील रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत ८०६७ नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय. तर मुंबई मध्ये गेल्या २४ तासात ५४२८ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात ओमायक्रॉनची संख्या हि ४५४ वर गेली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकार कडून शेतकऱ्यांना मिळणार गिफ्ट; शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार ‘इतके’ रूपये
- ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू; जाणून घ्या नवी नियमावली
- घोळ मासा खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !
- ग्रामीण जीवन, संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाल्याने ग्रामीण युवकांना प्रेरणा मिळेल – अजित पवार
- शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – बच्चू कडू