राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

मुंबई –  कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत.

राज्यात मंगळवारी २१७२ कोरोनाबाधितांची नोंद  झाली होती. राज्यात गेल्या 24 तासांत ३९०० नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबई मध्ये गेल्या २४ तासात २५१० कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ओमायक्रॉनचे 33 रुग्ण सापडले आहेत.

महत्वाच्या बातम्या –