गाजर हे आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. तसेच थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो. गाजराचा रस आणि मध एकत्र करून त्याचे ज्यूस प्यावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
तसेच गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं. अपचन, भूक मंदावणे, गॅसेस होणे, आंत्रव्रण (अल्सर), आतडय़ांना सूज येणे (कोलायटीस) यावर गाजराचा रस १ कप दोन वेळा प्यावा. सहा ते सात दिवस रस प्यायल्याने आतडय़ांच्या आतील श्र्लेष्मल त्वचेला बळकटी येऊन वरील आजार दूर होतात.
याच प्रमाणे अपचन, भूक मंदावणे, गॅसेस होणे, आंत्रव्रण, आतडय़ांना सूज येणे यावर गाजराचा रस १ कप दोन वेळा प्यावा. सहा ते सात दिवस रस प्यायल्याने आतडय़ांच्या आतील श्र्लेष्मल त्वचेला बळकटी येऊन वरील आजार दूर होतात.
दरम्यान, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा सगळ्या ऋतुंमध्ये गाजर आरोग्यास चांगले असते. विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यासाठी गाजर उपयुक्त आहे. तसेच लहान मुलांना गाजर खाण्यास आवडत नसेल तर गाजराचा हलवा याप्रमाणे अनेक पदार्थ तयार करता येतात.
जाणून घ्या, काय आहेत कापराचे घरगुती फायदे… https://t.co/ehZMBFv1aa
— KrushiNama (@krushinama) December 1, 2019
महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या, काय आहेत कापराचे घरगुती फायदे…
शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यासाठी मोफत सामायिक सुविधा केंद्र
राज ठाकरेंकडून काय शिकायला मिळालं? , आदित्य ठाकरे म्हणतात ….
शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा कंपन्यांनी धंदा मांडला ; बच्चू कडू