गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्यानंतर या अवकाळी पावसाला तीन महिने उलटूनही अद्याप येवला तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी आहे. शेतकरी अद्याप सुद्धा नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना तुटपुंजी का होईना शासनाकडून मदत मिळत आहे.
वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ 5 गोष्टी
पण ज्यांनी विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या हातात एक दमडीदेखील पडलेली नाही. त्यामुळे विमा कंपनीच्या या कारभारावर शेतकरी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मका आणि सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने लागवड केली होती. त्यात यंदा प्रथमच मक्यावर लष्करी अळीने आक्रमण केल्याने वारंवार औषध फवारणी करून काही प्रमाणात मका पीक वाचविले होते.
३ महिने उलटून फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही
गेल्या वर्षी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. त्याचीदेखील भरपाई मिळालेली नाही. काही विमाधारक शेतकरी दीड वर्षापासून, तर काही दोन महिन्यांपासून भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या वर्षीच्याअवकाळी पावसाने मका, सोयाबीनचे नुकसान झाले त्याचाही विमा काढलेला आहे. मात्र दोन्हीपण वर्षी एक रु पयांचीदेखील नुकसानभरपाई पीकविमा कंपनीकडून अद्याप मला मिळालेली नाही.
दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष योजना आणणार सरकार https://t.co/O2gBrThz0U
— KrushiNama (@krushinama) February 2, 2020