बाजरी हे आहाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे तृणधान्य आहे. बाजरीत लोह व जस्त अधिक प्रमाणात असते. लोहाचे प्रमाण कमी असल्यास मानवाच्या शारिरिक वाढ व मानसिक क्षमतेवर परिणाम होतो. तर जस्ताच्या कमतरतेमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आहारात लोह आणि जस्ताचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे.
कृषी महाविद्यालय धुळे येथील बाजरी संशोधन केंद्राने एम.एच २११४ (डी.एच.बी.एच.१३९७) हे बाजरीचे नवीन वाण विकसित केले असल्याची माहिती बाजरी संशोधन योजनेतील रोप पैदास शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. तथा संशोधक डॉ. एच.टी.पाटील यांनी दिली. या बाजरीच्या वाणात लोह आणि जस्ताचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे आदिवासी भागातील कुपोषण थांबविण्याकरिता उपयुक्त ठरू शकते,” अशी माहिती बाजरी संशोधन योजनेतील रोप पैदास शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. तथा संशोधक डॉ. एच.टी. पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्र वगळता राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणासह देशातील नऊ राज्यांसाठी हे संकरित वाण विकसित केले आहे. ज्या अवर्षणप्रवण क्षेत्रात ४०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो, त्याक्षेत्रासाठी हे वाण अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
हे वाण २०१२ मध्ये महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात खरीप लागवडीकरिता प्रसारित करण्यात आले. राज्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन, कमीत कमी पावसात व हलक्या जमिनीवर जास्त उत्पादन देणारे वाण विकसित करण्याच्या दृष्टीने बाजरी संशोधन योजनेने हे संकरित वाण विकसित केले आहे.
या वाणाचा लागवडीचा कालावधी १५ जून ते १५ जुलै असा आहे. प्रति एकरासाठी दीड किलो बियाणे लागत असून, पिकाचा कालावधी ७८ ते ८० दिवसांचा आहे. एका हेक्टरमध्ये ३४ ते ३५ क्विंटल उत्पन्न देणारे हे वाण आहे. या वाणाचे वैशिट्य म्हणजे लांब कणीस असून, ठोकळ व राखी रंगाचा दाणा आहे. हे वाण ‘गोसावी’ रोगास प्रतिबंध करीत असते. बाजरीचे हे संकरित वाण विकसित करण्यासाठी डॉ. व्ही.वाय. पवार, डॉ. आर.के. गवळे, डॉ. सी.एच. ठाकरे, डॉ.एन.एस. उगले, एम.जे. गावीत, यांचेही सहकार्य लाभले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या