कांद्याच्या दरात घसरण होत असता आता लसणाच्या दरात मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसूण सर्वसामान्या नागरिकांच्या आवाक्या बाहेर चालला आहे. लसणाचे दर प्रतिकिलो 280 रुपयांच्यावर गेले आहे. ठोक बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो 200 ते 210 रुपये दर आहे. त्याचा फटका सर्वसामान्या नागरिकांना बसू लागला आहे.
विद्यार्थ्यांनी केले कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
कांदा दरामध्ये आता घसरण होऊ लागली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु लसणाचे दर आता वाढू लागले आहे त्यामुळे स्वयंपाकघरातील फोडणीही महागली असून गृहिणीचे बजेट बिघडले आहे. अतिवृष्टीचा फटका बसल्याने कांदा, लसूण आणि आल्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. कांद्याचा दर किरकोळ बाजारात 60 रुपये किलोंवर पोहोचला आहे. कांद्याच्या दरांमध्ये घसरण होऊ लागली आहे. मात्र, लसणाचीही दरवाढ कायम दिसून येत आहे. किरकोळ बाजारात लसूण प्रतिकिलो 280 रुपयांवर पोहोचल्याने ग्राहकांचे बजेट बिघडले आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; तूर खरेदी केंद्र कधी उघडतील याची शाश्वती नाही https://t.co/sTuY6dl9kw
— KrushiNama (@krushinama) February 5, 2020