जमीन
पाण्याचा निचरा होणारी, मध्यम ते हलक्या प्रतीची जमीन
जाती
सरदार (एल -४९)
अभिवृध्दीचा प्रकार
दाब कलम
लागवडीचे अंतर
६० X ६० X ६० सें.मी आकाराचे खड्डे घेऊन २ कि. सिंगलसुपर फॉस्फेट खत टाकावे. ५ % मॅलॅथिआन (५०-६० ग्रॅम) पावडर मिसळावी. दोन झाडातील व ओळीतील अंतर ६ X ६ मीटर प्रति हेक्टरी झाडांची संख्या २७७ घन लागवडासाठी ३ X २ मी. अंतर ठेवावे.
खते
पूर्ण वाढ झालेल्या झाडास ४ ते ५ घमेली शेणखत, ९०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद व ३०० ग्रॅम पालाश, झाडाला बहार धरण्याचे वेळी द्यावीत पैकी निम्मा नत्र बहाराच्या वेळी व उरलेला नत्र फळधारणेनंतर द्यावा तर स्फुरद व पालाश एकाच हप्त्यात बहाराच्या वेळी द्यावा.
उत्पादन
७०० ते १५०० फळे प्रत्येक कलमी झाडापासून मिळतात.
कीड व रोग नियंत्रण
- पिठ्या ढेकूण – पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी जैविक व्हरटीसिलीयम लेकाणी (फुले बर्गासाईड) – ४० ग्रॅम १०० मि.ली. दुधात मिसळून १० लिटर पाण्यात फवारावे.
- फळमाशी – फळमाशीचे नियंत्रणासाठी रक्षक सापळ्याचा वापर करावा.
- मर रोग – मर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा पावडर (१०० ग्रॅम/झाड) शेणखतात मिसळून मातीत टाकावे किंवा बोर्डो मिश्रण (१%) द्रावणाची मातीत जिरवणी करावी.
- फळावरील डागांसाठी बाविस्टीन (०.१ %) + मॅन्कोझेब (०.२ %) ची फवारणी करावी.
इतर महत्त्वाचे
बागेत फांद्यांची दाटी झाल्यानंतर भरपूर सुर्यप्रकाश व हवा खेळती राहण्यासाठी तसेच यंत्राने मशागत करण्यासाठी हलकी छाटणी केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळ्यात फळांचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी २-४-५ टी ७० पीपीएम या संजीवकाची फवारणी करावी.