नाशिक – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ६,७,८ जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. तर हवामान अंदाजनुसार अमरावती जिल्ह्यात ८ जानेवारीला गारपिटीसह वादळी पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस पडला. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तूर, कपाशी, पिकांसह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात आजीनं २ दिवस जोरदार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच डिसेंबर महिन्यापासून शेतकरी मोठ्या अडचणीत आहे, कारण डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. तर डिसेंबर महिन्याच्या शेवटी ,म्हणजेच २७ डिसेंबर ला मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
- राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध; जाणून घ्या नवी नियमावली
- राज्यातील ‘या’ भागांमध्ये अवकाळी पाऊस; ज्वारी, हरभरा, मका, गहू पिकांचे मोठे नुकसान
- काळजी घ्या! देशात गेल्या २४ तासात 1 लाख 59 हजार 632 कोरोनाबाधितांची नोंद
- महाराष्ट्राचा ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प राजस्थान सरकारकडून स्वीकार
- जिल्हा वार्षिक योजना 2022-23 च्या 512 कोटी 4 लाख 72 हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता