Weight Lose Tips | टीम कृषीनामा: आजकाल वजन वाढणे ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. प्रत्येक दुसरा व्यक्ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी काही लोक जिममध्ये भरपूर घाम गाळतात, तर काही लोक खाणे पिणे कमी करतात. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे औषधे आणि प्रोटीन पावडरचे सेवन करतात. तुम्ही पण जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात काही पीठांचा समावेश करू शकतात. या पिठांचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात पुढील पिठांचा समावेश करू शकतात.
नाचणीचे पीठ (Ragi Flour Weight Lose)
वजन कमी करणाऱ्यांसाठी नाचणीचे पीठ उपयुक्त ठरू शकते. नाचणीचे पीठ ग्युटनमुक्त असते. त्यामुळे या पिठाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर या पिठामध्ये फायबर, ओमीनो ॲसिड, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळून येते. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी या पिठाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
ज्वारीचे पीठ (Jowar Flour For Weight Lose)
तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर ज्वारीचे पीठ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण या पिठामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयरन, विटामिन्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ज्वारीचे पीठ उपयुक्त ठरू शकते. या पिठाचे नियमित सेवन केल्याने पचन संस्था देखील निरोगी राहते.
बाजरीचे पीठ (Bajra Flour For Weight Lose)
बाजरीच्या पिठाचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहू शकते. कारण या पिठामध्ये विटामिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स, फायबर, मॅग्नेशियम इत्यादी पोषक घटक आढळून येतात. बाजरीच्या पिठाचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजरीच्या पिठाचे सेवन केले पाहिजे.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या