Black Sesame Benefits | काळ्या तिळाचे सेवन केल्याने शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Black Sesame Benefits | टीम कृषीनामा: पांढरे तीळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्याचबरोबर काळे तीळ देखील आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. सहसा काळ्या तिळाचा उपयोग पूजेसाठी केला जातो. त्याचबरोबर पदार्थांची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये काळे तीळ मिसळले जातात. थंडीच्या दिवसांमध्ये काळ्या तिळाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. कारण यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. काळ्या तिळामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, मॅग्नीज इत्यादी पोषक तत्वे आढळून येतात. त्यामुळे काळ्या तिळाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. काळ्या तिळाचे सेवन केल्याने शरीराला पुढील फायदे मिळू शकतात.

पचनसंस्था मजबूत राहते (Digestive system remains strong |Black Sesame Benefits)

थंडीमध्ये पचनाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काळ्या तिळाचे सेवन करू शकतात. काळ्या तिळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचनक्रिया मजबूत ठेवण्यास मदत करते. या तिळाचे सेवन केल्याने बद्धकोष्टता आणि अपचनाच्या समस्या देखील दूर होऊ शकतात.

हृदय निरोगी राहते (The heart remains healthy | Black Sesame Benefits)

काळ्या तिळाचे सेवन करणे हृदयासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये मॅग्नेशियम, सेलेनियम, आयरन, झिंक इत्यादी गुणधर्म आढळून येतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. या तिळाच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहते. त्याचबरोबर शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करायचा असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केला पाहिजे.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened |Black Sesame Benefits)

काळ्या तिळाचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. कारण यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. थंडीमध्ये काळ्या तिळाचे सेवन केल्याने तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर काळ्या तिळाचे सेवन केल्याने सर्दी, खोकला इत्यादी समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Job Opportunity | भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती! ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Skin Care With Ice | बर्फाच्या मदतीने चेहऱ्यावरील ‘या’ समस्या सहज होतात दूर

Weather Update | राज्यात थंडी वाढणार, हवामान विभागाचा इशारा

BSF Recruitment | BSF मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Rain Alert | ऐन फेब्रुवारीत मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ शहरांना हवामान खात्याकडून अलर्ट