हिवाळ्यात दुध, तुप, लोणी यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता, कॅलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होते.
गाजर हे चांगले पोषण करणारे, उष्ण व मधुर रसात्मक आहे. त्यात ‘अ’ जीवनसत्त्वही उत्तम प्रमाणात आहे. त्यामुळे हिवाळ्यात गाजर कोशिंबिरीच्या स्वरूपात किंवा तसेच कच्चे खाता येईल, गाजराचा घरी रस काढून घेता येईल, गाजराचा हलवा हा तर अनेकांच्या आवडीचाच पदार्थ असतो.
हिवाळ्यात स्निग्ध गुणांचा, बृहण करणारा, उष्ण आणि मधुर गुणांचा लसूण हिवाळ्यासाठी उत्तम आहे. लसणीत कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला साठा असतो. पोट साफ होण्यासाठी बोरे मदत करतात. लहान मुलांसाठी बोरे उत्तम टॉनिकसारखे काम करतात. त्यात मेंदू व मज्जातंतूंचे टॉनिक असल्यासारखे घटक आहेत.
तसेच हिवाळ्यात त्वचेखालच्या लहान रक्तवाहिन्यांचे विस्तारण करून शरीराला उबदार वाटण्याचा अनुभव देणारा लसूण आहे. बदाम, काजू, मणूका, अक्रोड इ. सुका मेव्यामध्ये स्निग्ध उष्ण गुणधर्म असल्याने त्याचा आहारात समावेश करावा.
महत्वाच्या बातम्या –
लातूरमध्ये जिल्हा प्रशासन आणि महापालिकेतर्फे आज पाणी परिषदेचे आयोजन
मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर ७०.८४ टक्क्यांवर
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमधील गोदावरी नदी काठावर राहाणाऱ्या नागरीकांचे प्रशासनाकडून स्थलांतर
पूरग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसोबतच हेक्टरी ६० हजार रुपयांची मदत द्यावी – काँग्रेस