जाणून घ्या गुलकंद खाण्याचे फायदे

गुलाबाचे फूल जितके नाजुक ,मोहक आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत.  साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’ चवीला अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे. जसजसा उकाडा वाढायला  लागतो , तसतसे पित्त, जळजळ , उष्माघात यासारखे आजार डोकं वर काढायला सुरूवात करतात. आयुर्वेदातही गुलकंदाचा वापर प्रामुख्याने अनेक औषधांमध्ये केला जातो. गुलकंदामध्ये व्हिटामिन सी, ई आणि बी भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने शरीर थंड राहते आणि उन्हाळ्यामुळे होणारा त्रास दूर होतो.

मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त

– गुलकंदाच्या सेवनाने शरीर ताजेतवाने राहते. तसेच गारवा मिळतो. उन्हामुळे येणारा थकवा, आळस, शरीरातील जळजळ दूर होते. शरीराला ऊर्जा देणारे हे टॉनिक आहे.

– उन्हाळ्यात अनेकांच्या नाकातून रक्त येते. यातून वाचण्यासाठी उन्हात जाण्याआधी दोन चमचे गुलकंद खा.

– गरोदर महिलांसाठी याचे सेवन खूपच फायदेशीर ठरते. गरोदरपणात बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर गुलकंद खाण्याने फायदा होतो.

तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी

– तोंड आल्यास गुलकंदाचे सेवन करावे. तसेच हिरड्या सुजल्यास यावरही गुलकंदाचे सेवन फायदेशीर ठरते.

– दररोज गुलकंद खाल्ल्याने त्वचा उजळते. यामुळे रक्त शुद्ध होते. त्यामुळे ब्लॅकहेड्स, पिपल्सच्या समस्या दूर होतात.