जाणून घ्या शेतीसाठी “वीज जोडणीची ” संपूर्ण प्रक्रिया !

भारतातील महाराष्ट्र हे शेती प्रमुख राज्य आहे, शेतीसाठी वीज (Electricity) अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यासाठीच शेतीपंपा साठी वीज कनेक्शन,वीज (Electricity) जोडणी तुम्हाला नव्याने करायची असेल तर काय असेल पद्धत हे घ्या पुढीलप्रमाणे जाणून.

सर्वात आधी तुम्हाला जवळील संगणक केंद्र अथवा मोबाइलवर A 1 अर्ज फॉर्म भरावा लागेल. हा फोन असतो शेतीसाठी नवीन कनेक्शन घ्यायचं आहे वीज जोडणी करायची आहे.फॉर्म उगघडल्या नंतर तुम्हाला नवीन कनेक्श वर क्लिक करावं लागेल त्याच बरोबर थ्री फेज कनेक्शन पाहिजे असल्यास त्यावरती क्लीक करा. त्यानंतर संपूर्ण माहिती आपल्याला भरणे फार महत्वाचे असते. तरी हा फॉर्म काही अवघड पद्धतीचा नसतो.

त्याच सोबत तुम्हाला कागदपत्रे जोडावी लागतात..

सातबारा, सातबारा नोंद ( विहरी असेल तर विहरीची नोंद असणे आवश्यक ) , सामाईक संमती (सह हिस्सेदार कोणी असेल तर १०० रुपये स्टॅम्प पेपर वर संमती पत्र जोडावे ) , पाणी परवाना, रेशनकार्ड,आधार कार्ड, मतदानकार्ड .

पहिला फॉर्म भरून झाल्यानंतर हे कागदपत्र त्यासोबत जोडायचे आहे.हा फॉर्म भरल्यानंतर सर्वात आधी आपल्याला वीजवितरक कंपनी मध्ये. तेथील वायरमन असेल जो आपल्या भागात वीज जोडणी चे काम करत असतो. जो आपण भरलेला फॉर्म असतो तो त्यांच्याकडे जमा करायचा आहे.

त्यानंतर वायरमन हा वीज जोडणीसाठी नकाशा तयार करतो म्हणजेच तुम्हाला कश्या पद्धतीने वीज पोहचवली जाऊ शकते सर्व बाजूंचा विचार केला जातो. काही पोल वगैरे (खांब) लागतात का तर ह्या सर्व गोष्टी वीजजोड नकाशात टाकतो ते तयार करतो.

त्यांनतर तुम्हाला उपविभागीय कार्यालयात जाऊन आवक नंबर टाकावा लागतो हे महत्वाचे असते. ( ह्या गोष्टी ह्या प्रक्रिया घडत असताना हे तुम्हाला करावे लागते ) तुम्ही तो नंबर टाकल्यास तो फॉर्म पुढे शाखा अभियंता कडे जातो त्याची तपासणी होते. त्यांनंतर पुढे फॉर्म हा सहायक कार्यकारी अभियंता कडे जातो तांत्रिक काही अडचणी काही आहेत का त्याचा तपास केला जातो . त्यांनंतर तुम्हाला अनामत राक्कम हि भरावी लागते हि रक्कम पोळ वगैरे लागत असतील यावर आधारित असते.रक्कम भरल्यानन्तर टेस्ट रिपोर्ट तुम्हाला दिला जातो. हा रिपोर्ट तुम्हाला सहाय्य्क कार्यकारी अभियंता कडे द्यावा लागतो.

हि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वीज पोहचवली जाते.

महत्वाच्या बातम्या –