चेहरा धुतल्यानंतर ताजतवानं आणि फ्रेश वाटतं त्यामुळे प्रत्येकजण दिवसातून किमान दोन-तीन वेळा तरी चेहरा धुतोच. पण तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं चेहरा धुवत असाल तर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी हे हानिकारक ठरू शकतं. तुम्ही विचार करत असाल कि चेहरा धुताना कसली आलीये चुकीची पद्धत? पण तुम्ही पुढील काही चुकीच्या पद्धती जाणून घेतल्या तर तुमचा हा समज निघून जाईल…
- चेहरा जास्त घासण्याने रंग गोरा दिसेल असा विचार डोक्यातून काढून टाका कारण जास्त घासणं चेहऱ्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
- चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी काहीजण दिवसभरात सतत फेस वॉशने चेहरा धुतात. यामुळे त्वचा कोरडी किंवा तेलकट होऊन त्वचेचे नुकसान होते.
- चेहऱ्यावरील निर्जीव त्वचा निघुन जाण्यासाठी अनेक जण स्क्रबिंग करत असतात मात्र आठवडयातून केवळ दोन किंवा तीन वेळा स्क्रबिंग करावे. त्यापेक्षा जास्त स्क्रबिंग केल्यास त्वचेचे नुकसान होते.
-
चेहरा धुण्यासाठी आपण अनेक सौंदर्य प्रसाधन वापरतो. यामध्ये साबण, फेसवॉश आदींचा समावेश होतो. पण या गोष्टी आपण डॉक्टरांचा सल्ला न घेता वापरात असतो. त्यामुळे चुकीच्या उत्पादनांची निवड केल्यानंतर त्याचा परिणाम थेट तुमच्या चेहऱ्यावर होतो.
-
चेहऱ्यावर तुम्ही सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला असेल तर घाईघाईने चेहरा धुवू नका. यामुळे चेहऱ्यावर केमिकल्स तसेच राहतात व चेहऱ्यावरील छिद्रे बुजतात.
-
चेहरा कायम स्वच्छ तलम सुती कपड्याने पुसावा व घासून पुसण्याऐवजी फक्त हलक्या हाताने पुसावे. अनेकजण चेहरा धुतल्यानंतर तो टॉवेलने घासून पुसतात त्यामुळे त्वचेचे नुकसान होते.
-
फेसवॉशने चेहरा धुताना पाणी जास्त गरम नसलं पाहिजे याने स्किन खराब होते. त्वचेसाठी जास्त गार पाणी ही योग्य नाही म्हणून ताज्या किंवा कोमट पाण्याने चेहरा धुवायला हवा.
महत्वाच्या बातम्या –