जळगावात भरताची वांगी १६०० ते २००० रुपये

कृषी उत्पन्न बाजार समितीत भरताच्या वांग्यांची ३१ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६०० ते २००० रुपयांपर्यंत मिळाले. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत. बाजारात शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. त्याच्या शेंगांना प्रतिक्विंटल १८०० ते २५०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ३१ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला. बिटला प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर मिळाला.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा, भेंडी, टोमॅटो आवक कमी

लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर होता. आल्याची १८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २४०० ते ५२०० रुपये दर मिळाला.गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते ४२०० रुपये मिळाला. बटाट्याची २५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १३०० ते १८०० रुपये दर होता. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये मिळाला.

बाजार समितीमध्ये धानाची आवक मंदावली

टोमॅटोची १५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १३०० ते १९०० रुपये मिळाला. कोबीची २० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ११०० ते २००० रुपये मिळाला. काटेरी, लहान वांग्यांची २५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल ७०० ते १३०० रुपये दर मिळाला.  कोथिंबिरीची नऊ क्विंटल आवक झाली. ५०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची आठ क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर होता.