आज दुपारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर आज एसटी कर्मचारी संप आणि ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे.

ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाने स्थिगीती दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर प्रचंड टीका होत आहे. विरोधकही आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. अशातच, आरक्षण नाही, तर मतदान नाही, असा निर्धार भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी मतदारांनी केला आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे ओबीसी नेते या बैठकीत गदारोळ घालण्याची शक्यता आहे.

यासह राज्यावर ओढावलेले ओमायक्रॉनच्या (Omaycron) संकटावरही मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात ओमायक्रोनचे रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली असून, हे संकट रोखायचे कसे आणि आणखी कशा पद्धतीच्या उपाययोजना कराव्या लागतील, यावर विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे.