Grape Juice | टीम कृषीनामा: द्राक्ष आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्याचबरोबर द्राक्षाचा रस आपल्या शरीरासाठी त्याचबरोबर चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. बाजारामध्ये दोन प्रकारची द्राक्ष मिळतात. त्यामध्ये काळ्या आणि हिरव्या द्राक्षांचा समावेश आहे. हिरव्या द्राक्षाचा रस चेहऱ्यावर लावल्याने अनेक समस्या सहज दूर होतात. त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी द्राक्षाच्या रसाचा वापर केला जाऊ शकतो. द्राक्षाच्या रसामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेला निरोगी ठेवतात आणि त्वचेवरील कोरडेपणाची समस्या दूर करतात. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी द्राक्षाच्या रसाचा पुढील पद्धतीने वापर करा.
द्राक्षाचा रस आणि मध (Grape Juice & Honey For Skin Care)
द्राक्षाचा रस आणि मध चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला दोन चमचा द्राक्षाच्या रसामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा गुलाबजल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर पंधरा मिनिटे लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील काळ्या डागांची समस्या सहज दूर होऊ शकते.
द्राक्षाचा रस आणि बेसन (Grape Juice & Besan For Skin Care)
चेहरा चमकदार बनवण्यासाठी आणि त्याचा रंग सुधारण्यासाठी द्राक्षाचा रस आणि बेसन फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचा द्राक्षाच्या रसामध्ये एक चमचा बेसन आणि दीड चमचा हळद मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा नियमित वापर केल्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवेल.
द्राक्षाचा रस आणि गाजर (Grape Juice & Carrot For Skin Care)
चेहऱ्याची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेण्यासाठी द्राक्षाचा रस आणि गाजर उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचे द्राक्षाच्या रसामध्ये एक चमचा गाजराचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते चेहरा आणि मानेवर दहा मिनिटे लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. गाजर आणि द्राक्षाच्या रसाच्या या मिश्रणाने त्वचा स्वच्छ होते आणि निरोगी राहते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या