Skin Care Routine | त्वचा सुंदर आणि तरुण ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी करा ‘या’ गोष्टी

Skin Care Routine | टीम कृषीनामा: प्रत्येकालाच सुंदर आणि निरोगी त्वचा हवी असते. त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. पण ही उत्पादन त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही या टिप्स फॉलो केल्यावर तुमची त्वचा दीर्घकाळ निरोगी राहू शकते. त्वचेची काळजी घेण्यासाठी झोपण्यापूर्वी तुम्ही पुढील गोष्टी करू शकतात.

मेकअप काढायला विसरू नका (Don’t forget to remove your makeup – Skin Care Routine)

आजकाल स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच चांगले दिसायला आवडते. त्यासाठी प्रत्येकजण मेकअप करत असतो. मेकअप करण्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, काही प्रमाणात पुरुष देखील मेकअप करत असतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुमचा मेकअप पूर्णपणे काढायला विसरू नका. रात्रभर चेहऱ्यावर मेकअप राहिल्याने त्वचेला नुकसान होऊ शकते. त्यामुळे झोपण्यापूर्वी नेहमी मेकअप काढूनच झोपले पाहिजे.

चेहरा धुवायला विसरू नका (Don’t forget to wash your face – Skin Care Routine)

चेहऱ्यावर मेकअप असो किंवा नसो. पण रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवायला विसरू नका. आपण दिवसभर वेगवेगळ्या कामात गुंतलेले असतो. त्यामुळे चेहऱ्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित धुतला पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेला अधिक फायदे मिळू शकतात.

मॉइश्चरायझर लावायला विसरू नका (Don’t forget to apply moisturizer – Skin Care Routine)

तुम्हाला चमकदार आणि मुलायम त्वचा हवी असेल तर रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेतील आर्द्रता टिकून राहते. मॉइश्चरायझरच्या ऐवजी तुम्ही खोबरेल तेल किंवा कोणत्याही प्रकारचे लोशन किंवा क्रीम वापरू शकतात. त्वचेला नियमित मॉइश्चरायझर लावल्याने तुम्ही सर्व त्यांच्या समस्येपासून दूर राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Grape Juice | चेहरा निरोगी ठेवण्यासाठी द्राक्षाच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Railway Recruitment | रेल्वेत नोकरीची संधी! दहावी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

Coconut Oil | चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Honey Benefits | रोजच्या आहारात करा मधाचा समावेश, मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Job Vacancies | BSF च्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू