राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अजुनही बदलली नाही. परंतु काळाची गरज काही शेतकरी आधुनिक साधनांचा उपयोग करीत आहेत. सामान्य शेतकऱ्यांनाही यांत्रिकी साधने विकत घेता येईल, यासाठी शासनाने अनुदान द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पूर्वी मनुष्यबळ व बैलांचा वापर करून वखरणी, नांगरणीपासून पीक काढण्यापर्यंतची कामे केल्या जात होती. आजही हीच पद्धत सुरू आहे. योग्य प्रमाणात गाय-बैलांना पुरेसे खाद्यान्न मिळत होते. परंतु तंत्रज्ञानाचा विकास होत गेला व नवनवीन शेतीपूरक साधने तयार होऊ लागली. यामध्ये ट्रॅक्टर, हार्वेस्टर मशीन ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेची झाली आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञान वापरण्याची शेतकऱ्यांची क्षमता नाही. परंतु या तंत्रज्ञानाचे महत्त्व शेतकऱ्यांनी ओळखले आहे.
शेतकऱ्यांची दुसरी पिढी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यास उत्सूक आहे. पूर्वी बैलांच्या मदतीने शेतााची वखरणी करण्यासाठी सहा-सात दिवस लागायचे.पैसा व वेळेची बचत होत असली तरी बैलजोडीचा अभाव व शेतमजुांची कमतरता हे प्रश्न कायम होते. वखरणी झाल्यानंतर निंदन, कीटकनाशकाची फवारणी ही सर्व कामे आता मशीनच्या सहाय्याने होऊ लागली आहे.
एवढेच काय तर पीक काढण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा उपयोग होऊ लागला. शेतात चिमण्या-पाखरांचा किलकिलाट यंत्रणांच्या आवाजाने दबला आहे. माळराणातून शेतीचे गाणे ऐकू येणे नाहीसे झाले. शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीच हलाखीची असल्याने कवी कल्पना उपयोगाच्या नाहीत. ही स्थिती बदलावी म्हणून तो यांत्रिक साधनांकडे आशावादी दृष्टीने पाहत आहे. खतांचा वारेमाप वापर, तणनाशक जाळणे यामुळे जमिनीची सुपिकता नाहीशी झाली.
तरीही तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. शासनाने नवीन धोरण तयार करून शेतकऱ्यांना अल्प दरात शेतीची साधने उपलब्ध करून दिली पाहिजे.राज्य शासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात. परंतु ग्रामीण, आदिवासी भागातील गरजु शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. मागील वर्षी खरीप हंगाम अनेक शेतकऱ्यांनी यांत्रिक साधनाची मागणी कृषी विभागाकडे केली होती. पण, उपयोग झाला नव्हता.
महत्वाच्या बातम्या-
झाडे लावणे हा स्वर्गात जाण्याचा समृद्धी मार्ग आहे – सुधीर मुनगंटीवार
शेतकऱ्यांना आता थेट गोदामांतून करता येणार आपल्या मालाची देशभर कोठेही विक्री