Papaya and Besan | टीम कृषीनामा: आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे प्रोडक्ट वापरतात. पण हे प्रॉडक्ट चेहऱ्याला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्यामुळे चेहऱ्याला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही पपई आणि बेसनाच्या फेस पॅकचा वापर करू शकतात. हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक वाटी साल काढलेली पपई घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दीड चमचा बेसन मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला ते दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावे लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील पुढील समस्या दूर होऊ शकतात.
पिंपल्स दूर होतात (Pimples go away-Benefits of Papaya and Besan Facepack)
चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही पपई आणि बेसनाचा फेसपॅक लावू शकतात. कारण या दोन्हीमध्ये आढळणाऱ्या अँटिबॅक्टरियल गुणधर्म त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट करून पिंपल्स दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर या फेस पॅकच्या मदतीने त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.
चेहऱ्यावर चमक वाढते (The glow on the face increases-Benefits of Papaya and Besan Facepack)
या फेस पॅकच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढू शकते. त्याचबरोबर हा फेस पॅक वापरल्याने त्वचेवरील जवळजवळ सर्व समस्या दूर होतात आणि चेहरा डाग मुक्त होतो. या फेस पॅकच्या मदतीने चेहऱ्याचा रंग सुधारण्यास मदत होते. त्यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही या फेसपॅकचा वापर करू शकतात.
चेहऱ्यावरील डाग साफ होतात (The spots on the face are cleared-Benefits of Papaya and Besan Facepack)
तुम्ही जर चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी उपाय शोधत असाल तर हा फेस पॅक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्हाला काही आठवडे हा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा लागेल. या फेसपॅकचे नियमित वापराने त्वचेवरील डाग कमी होतात आणि त्वचेचा रंगही सुधारतो.
त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही पपई आणि बेसनाच्या फेस पॅकचा वरील पद्धतीने वापर करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही आवळ्याच्या रसाचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.
आवळा रस आणि मध (Amla juice and honey-For Skin Care)
आवळा रस आणि मधाच्या मदतीने चेहऱ्यावरील सुरकुत्या सहज दूर केल्या जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला चार चमचे आवळ्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आवळ्याच्या रसासोबत मध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार होते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होऊ शकतात.
आवळा रस आणि खोबरेल तेल (Amla juice and coconut oil-For Skin Care)
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही आवळा रस आणि खोबरेल तेलाचे मिश्रण त्वचेला लावू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा खोबरेल तेलामध्ये दोन चमचे आवळ्याचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील सुरकुत्या सहज कमी होऊ शकतात.
आवळा रस आणि ऑलिव्ह ऑइल (Amla juice and olive oil-For Skin Care)
आवळ्याचा रस आणि ऑलिव्ह ऑइलच्या मदतीने चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचे आवळ्याच्या रसामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. तेलकट त्वचा असलेल्यांनी या मिश्रणाचा वापर करणे टाळले पाहिजे.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या