Cockroach | घरामध्ये झुरळाचे प्रमाण वाढले आहे? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Cockroach | टीम कृषीनामा: घरामध्ये दिसणाऱ्या घाणेरड्या आणि हानिकारक कीटकांच्या यादीमध्ये झुरळाचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. झुरळ दिसायला तर खराब दिसतातच पण त्याचबरोबर ते घरातील भांडी आणि इतर गोष्टी देखील घाण करतात. या भांड्यांमध्ये अन्न खाल्ल्यास तुम्ही आजारी पडू शकतात. घराच्या बेसिनमध्ये किंवा बाथरूममध्ये देखील झुरळ फिरत असतात. या झुरळांच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. घरातील वाढत्या झुरळांचे प्रमाण कमी करायचे असेल तर तुम्ही पुढील घरगुती पद्धतीचा वापर करू शकतात.

गरम पाणी आणि सोडा (Hot water and soda-For Cockroach)

घरातील नको असलेली झुरळे दूर करण्यासाठी तुम्ही गरम पाणी आणि सोड्याचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि दोन चमचे बेकिंग सोडा मिसळून घ्यावा लागेल. घरामध्ये ज्या ठिकाणी झुरळ लपून बसतात त्या जागेवर तुम्हाला हे पाणी शिंपडावे लागेल. झुरळ या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर वेदनेने मारायला लागतात. या द्रवण्याच्या मदतीने घरातील झुरळ कमी होऊ शकतात.

कडुलिंब (Neem-For Cockroach)

कडुलिंब एक कीटकनाशक म्हणून कार्य करते. कडुलिंबाच्या तेलाची चव आणि सुगंध कीटकांना मारण्यास मदत करते. घरातील झुरळ कमी करण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये कडुलिंबाचे तेल मिसळून झुरळांवर त्याची फवारणी करू शकतात. या पाण्यामुळे झुरळ कमी होण्यास मदत होते.

बेकिंग सोडा आणि साखर (Baking soda and sugar-For Cockroach)

बेकिंग सोडा आणि साखरेच्या मदतीने घरातील झुरळ कमी होऊ शकतात. यासाठी तुम्हाला बेकिंग सोडा आणि साखर समान प्रमाणात मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला पेस्ट कंट्रोल पावडर म्हणून देखील वापरता येऊ शकते. ज्या ठिकाणी झुरळ लपून बसलेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी हे मिश्रण टाकावे लागेल. झुरळ या मिश्रणाच्या संपर्कात आल्यावर मरायला सुरुवात होईल.

काकडी (Cucumber-For Cockroach)

काकडीच्या मदतीने तुम्ही झुरळांना पळवून लावू शकतात. कारण झुरळाला काकडीचा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे झुरळे काकडीपासून दूर पळतात. घरात ज्या ठिकाणी झुरळ लपून बसलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही काकडीचा रस शिंपडू शकतात. काकडी रसाच्या मदतीने घरातील झुरळ कमी होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Fenugreek Seeds | सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Amla Juice | चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आवळ्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Papaya Smoothie | पपई स्मुदी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Weight Gain | वजन वाढवण्यासाठी सकाळी नाश्त्यात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Dry Cough | कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय