Alovera | टीम कृषीनामा: कोरफड आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये विटामिन सी विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे केसांना निरोगी ठेवण्यासाठी कोरफडीचा गर खूप फायदेशीर असतो. केसांची संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर करू शकतात. कोरफडीचा गर केसांना लावल्याने केस गळणे, कोरडे केस, कोंडा यासारख्या समस्या सहज दूर होतात. केसांना निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही पुढील पद्धतीने कोरफडीचा वापर करू शकतात.
कोरफड आणि दही (Aloevera and curd for Hair Care)
कोरफड आणि दही यांचे मिश्रण केसांसाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला दोन टेबलस्पून एलोवेरा जेलमध्ये दोन चमचे दही मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण टाळूवर आणि केसांवर अर्धा तास लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. तुम्ही या मिश्रणाचा आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापर करू शकतात.
कोरफड आणि मेथी दाणे (Aloevera and fenugreek seeds for Hair Care)
तुम्ही जर केसातील कोंड्याच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर कोरफड आणि मेथी दाण्याचे मिश्रण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण मेथीदाण्यांमध्ये अँटी इम्प्लिमेंटरी अंटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म केसांसाठी खूप फायदेशीर असतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर सकाळी तुम्हाला त्याची पेस्ट तयार करून त्यामध्ये दोन चमचे कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला साधारण एक तास ते केसांवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील.
कोरफड आणि कांद्याचा रस (Aloevera and onion juice)
केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफडीमध्ये कांद्याचा रस मिसळून लावू शकतात. कांद्याच्या रसामध्ये सल्फर आढळून येते, जे केस गळतीची समस्या कमी करते. यासाठी तुम्हाला चार चमचे कांद्याच्या रसामध्ये दोन चमचा कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण एक तास केसांवर लावून ठेवावे लागेल. एक तासानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. खेड्यातून दोन वेळा तुम्ही या मिश्रणाचा वापर करू शकतात.
केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही पुढील हेअर मास्क वापरू शकतात (You can use following hair masks to take care of hair)
कोरफड हेअर मास्क (Aloevera Hair Mask)
केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही कोरफडीचा हेअर मास्क वापरू शकतात. यासाठी तुम्हाला कोरफडीचा गर काढून घ्यावा लागेल. त्यानंतर तो तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावा लागेल. या हेअर मास्कच्या नियमित वापराने केस मजबूत होऊ शकतात. त्याचबरोबर हा हेअर मास्क वापरल्याने केस चमकदार आणि मऊ होऊ शकतात.
मेथी हेअर मास्क (Fenugreek Hair Mask)
केस लांब आणि दाट करण्यासाठी तुम्ही मेथी हेअर मास्कचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर सकाळी तुम्हाला हे दाणे बारीक करून त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. तयार झालेला हा हेयर मास्क तुम्हाला साधारण वीस मिनिटे केसांना लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. या हेअर मास्कच्या नियमित वापराने कोंडा, केस गळणे यासारख्या समस्या दूर होऊ शकतात.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या