Hair Mask | टीम कृषीनामा: प्रत्येकाला लांब, दाट आणि सुंदर केस हवे असतात. केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे रसायनिक उत्पादन वापरतात. मात्र, या उत्पादनामुळे केसांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती पद्धतीचा अवलंब करू शकतात. यामध्ये तुम्ही काही हेअर मास्क वापरून केसांची काळजी घेऊ शकतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही पुढील हेअर मास्क वापरू शकतात.
शिकाकाई आणि आवळा हेअर मास्क (Shikakai and Amla Hair Mask)
तुम्हाला जर लांब आणि दाट केस हवे असतील तर तुम्ही आवळा आणि शिकाकाईचा हेअर मास्क केसांना लावू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचा आवळा पावडर आणि दोन चमचे शिकाकाईमध्ये पाणी मिसळून त्याचे मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला साधारण 45 मिनिटे केसांना लावून ठेवावे लागेल. 45 मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस साध्या पाण्याने धुवावे लागतील.
कोरफड हेअर मास्क (Aloevera Hair Mask)
केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही कोरफडीचा हेअर मास्क वापरू शकतात. यासाठी तुम्हाला कोरफडीचा गर काढून घ्यावा लागेल. त्यानंतर तो तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावा लागेल. या हेअर मास्कच्या नियमित वापराने केस मजबूत होऊ शकतात. त्याचबरोबर हा हेअर मास्क वापरल्याने केस चमकदार आणि मऊ होऊ शकतात.
मेथी हेअर मास्क (Fenugreek Hair Mask)
केस लांब आणि दाट करण्यासाठी तुम्ही मेथी हेअर मास्कचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर सकाळी तुम्हाला हे दाणे बारीक करून त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. तयार झालेला हा हेयर मास्क तुम्हाला साधारण वीस मिनिटे केसांना लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. या हेअर मास्कच्या नियमित वापराने कोंडा, केस गळणे यासारख्या समस्या दूर होऊ शकतात.
दही हेअर मास्क (Curd Hair Mask)
दही हेअर मास्क लावल्याने तुमचे केस दाट आणि लांब होऊ शकतात. यासाठी तुम्हाला दह्यामध्ये लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळून येते, जे केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.
नारळाचे दूध आणि मध (Coconut Milk & Honey Hair Mask)
नारळाचे दूध आणि मध केसांसाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला चार चमचे नारळाच्या दुधात एक चमचा मध मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला किमान अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाचा वापर केल्याने केसांना पोषण मिळून केसांची लवकर वाढ होते.
कोकोनट मिल्क (Coconut Milk Hair Mask)
केसांना चमकदार आणि मजबूत बनवण्यासाठी तुम्ही फक्त कोकोनट मिल्क केसांवर लावू शकतात. कारण कोकोनट मिल्क हे एक नैसर्गिक कंडिशनर आहे. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये कोकोनट मिल्क घेऊन केसांच्या मुळापर्यंत ते लावावे लागेल. कोकोनट मिल्क केसांना लावण्यासाठी तुम्ही कापसाचा देखील वापर करू शकतात. कोकोनट मिल्क तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटे केसांवर ठेवून नंतर ते धुवावे लागेल.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या