Rose Water | टीम कृषीनामा: चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी गुलाब जलचा वापर केला जातो. त्याचबरोबर अनेक सौंदर्य प्रसाधन कंपन्या गुलाब जलपासून वेगवेगळे प्रकारचे सौंदर्य उत्पादन बनवत असतात. बहुतेक लोक गुलाब जलचा क्लिनर म्हणून वापर करतात. तर बहुतांश लोक चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी देखील गुलाब जल वापरतात. चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स इत्यादी गोष्टी दूर करण्यासाठी गुलाब जल उपयुक्त ठरू शकते. गुलाब जलचा पुढील पद्धतीने वापर करून चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर होऊ शकते.
गुलाब जल आणि ग्लिसरीन (Rose water and aloevera-For Skin Care)
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही गुलाब जलसोबत कोरफडीचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एलोवेरा जेलमध्ये गरजेनुसार गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण किमान अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. कोरफडीमध्ये आढळणारे अँटिबॅक्टरियल गुणधर्म चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करतात. कोरफड आणि गुलाब जल मिसळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची चमक वाढू शकते.
गुलाब जल आणि ग्लिसरीन (Rose water and Glycerin-For Skin Care)
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुलाब जलमध्ये ग्लिसरीन मिसळू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे गुलाबजलमध्ये तीन ते चार थेंब ग्लिसरीन मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. तुम्ही हे मिश्रण आठवड्यातून तीन वेळा चेहऱ्यावर लावू शकतात. या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील डागांची समस्या दूर होऊ शकते आणि त्वचेचा रंग सुधारू शकतो.
गुलाब जल आणि चंदन पावडर (Rose water and sandalwood powder-For Skin Care)
चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्ही गुलाब जल आणि चंदन पावडरचे मिश्रण वापरू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा चंदन पावडरमध्ये दोन चमचे गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला ते साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने चेहऱ्यावरील जळजळ आणि लालसरपणा कमी होऊ शकतो. त्याचबरोबर या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवर नैसर्गिक चमक येऊ शकते.
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही गुलाब जलचा वरील पद्धतीने वापर करू शकतात. त्याचबरोबर तेलकट त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुढील पद्धती फॉलो करू शकतात.
चंदन (Sandalwood-For Oily Skin)
तेलकट त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी चंदन फायदेशीर ठरू शकते. चंदनामध्ये आढळणारे घटक त्वचेवरील पिंपल्स, पुरळ आणि तेलकटपणा दूर करू शकतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही थेट चेहऱ्यावर चंदन लावू शकतात. चंदनाच्या मदतीने त्वचा हायड्रेट राहू शकते. त्याचबरोबर चंदनाचा वापर केल्याने त्वचा थंड राहण्यास मदत होते.
कोरफड (Aloevera-For Oily Skin)
कोरफड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्याचबरोबर कोरफडीमध्ये आढळणारे घटक आपल्या त्वचेसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. कोरफडीमध्ये अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यास मदत करतात. कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावल्याने तेलकटपणा तर दूर होतोच पण त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग देखील कमी होऊ शकतात.
कडुलिंबाची पाने (Neem leaves-For Oily Skin)
कडीलिंबू एक आयुर्वेदिक वनस्पती आहे, ज्यामध्ये अँटीबॅक्टरियल आणि अँटी फंगल गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यासाठी कडुलिंबाची पाने फायदेशीर ठरू शकतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही कडुलिंबाची पेस्ट चेहऱ्याला लावू शकतात. कडुलिंबाच्या मदतीने डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर याच्या नियमित वापराने त्वचेचा रंग सुधारू शकतो.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या