Weight Loss Tips | हिवाळ्यामध्ये वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘हे’ सोपे व्यायाम

Weight Loss Tips | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढते वजन (Weight) ही एक सामान्य समस्या झाली आहे. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येला झुंज देत आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून स्वतःला वेळ देता येत नसल्यामुळे वजन वाढण्याची समस्या अधिकच वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही दिवसभरातील थोडा वेळ मिनिटे काढून पुरेसा व्यायाम करू शकतात. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही पुढील सोपे आणि कमी वेळात होणारे व्यायाम करू शकतात.

वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी (Weight Loss) करा पुढील व्यायाम 

जम्पिंग जॅक्स

वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जम्पिंग जॅक्स हा एक सर्वोत्तम व्यायाम पर्याय ठरू शकतो. नियमित पाच मिनिटे जम्पिंग जॅक्स केल्याने तुमच्या हात, पाय, पोट आणि शरीराच्या खालच्या भागातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. जम्पिंग जॅक्स करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सरळ उभे राहावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हात वर करून उड्या मारावा लागेल. उड्या मारताना श्वासाच्या प्रक्रियेकडे लक्ष द्या. नियमित हा व्यायाम पाच मिनिटे केल्याने तुमच्या शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते.

पुशअप्स

नियमित पुशअप्स केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते. तुम्ही पाच मिनिटांमध्ये पुशअप्स चार सेट मारू शकतात. पुशअप्स करताना सुरुवातीला तुम्हाला थोडा वेळ लागेल, पण नंतर हळूहळू तुम्हाला सवय होऊन जाईल. नियमित पाच मिनिटे पुशअप्स केल्याने तुमची छाती, बायसेप्स आणि खांदे मजबूत होऊ शकतात.

क्रंचेस

पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी क्रंचेस हा एक रामबाण उपाय ठरू शकतो. नियमित क्रंचेस केल्याने संपूर्ण पोटाच्या स्नायूवर ताण पडतो. त्याचबरोबर नियमित क्रंचेस केल्याने ॲब्सचे स्नायू देखील मजबूत होतात. नियमित पाच मिनिटे क्रंचेस केल्याने तुमच्या पोटावरील आणि शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या