मुंबई – देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 1 लाख 68 हजार 63 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.
देशात गेल्या 24 तासात 277 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे, गेल्या २४ तासात देशात 69,959 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 58 लाख 75 हजार 790 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. देशात आतापर्यंत 4 लाख 84 हजार 213 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात3 कोटी 45 लाख 70 हजार 131 कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ भागांमध्ये २ दिवस जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – वर्षा गायकवाड
- महाआवास अभियानांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – अशोक चव्हाण
- कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही – अनिल परब
- जिल्हा वार्षिक योजनेच्या 248 कोटी 66 लाख 53 हजार प्रारूप खर्चाच्या आराखड्यास मान्यता
- वजन कमी करण्यास पनीर आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे