मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी (Premature) पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील नाशिक , अमरावती , रत्नागिरीत , धुळे या जिल्ह्यांमध्ये अवकाळी (Premature) पाऊस पडला. तर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा, कळवण, सटाणा, निफाड, चांदवड, दिंडोरी, तालुक्यांना अवकाळी पावसाने दणका दिला आहे. तर या जिल्ह्यात मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण आहे, ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे, या ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर मावा, करपा या रोग्णांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे,
तर राज्यातील रत्नागिरीत जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडलेल्यामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. रत्नागिरीत जिल्ह्यात संत्रा, हरभरा, तूर पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात ८ जानेवारीला गारपिटीसह वादळी पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस पडला. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तूर, कपाशी, पिकांसह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
धुळे जिल्ह्यात ७ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, शिंदखेडा, शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा अनेक भागात अवकाळी पावसाने दणका दिला आहे. तर या भागात अवकाळी पाऊस झाल्याने ज्वारी, हरभरा, मका, गहू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- जिल्हा वार्षिक योजनेच्या 248 कोटी 66 लाख 53 हजार प्रारूप खर्चाच्या आराखड्यास मान्यता
- वजन कमी करण्यास पनीर आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे
- महाराष्ट्राचा ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प राजस्थान सरकारकडून स्वीकार
- जिल्हा वार्षिक योजना 2022-23 च्या 512 कोटी 4 लाख 72 हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता