Share

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात २९ साखर कारखाने सुरु

पुणे – पुणे जिल्ह्यात २९ साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये १३ खासगी तर १६ सहकारी साखर कारखाने (Sugar factory) सुरु झाले आहे. राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये ११५.५८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये ११५.९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील साखर उतारा १०.०४ टक्के आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये १५ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल १९२ साखर कारखाने (Sugar factory) उसाचे गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९७ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १९२ साखर कारखान्यांकडून ५९४.०६ लाख टन उसाचे गाळप  करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात १५ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल ५८८.४३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर  यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा ९.९१ टक्के इतका आहे.

महत्वाच्या बातम्या – 

मुख्य बातम्या साखर

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon