मुंबई – यंदा २०२१-२२ मध्ये राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १८२ साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात ७ डिसेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १८२ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ९१ खासगी व या मध्ये राज्यातील ९१ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. तर राज्यात ७ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल २७२.६ लाख टन उसाचे गाळप तयार करण्यात आले आहे. तर राज्यातील साखर उत्पादनातही वाढ झाली आहे
राज्यात ७ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल २५२.६३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.२७ टक्के इतका आहे.
राज्यात ७ डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वाधिक ४३ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरु झाले आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, राज्यात ७ डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल ६६.२२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ५६.१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर उतारा ८.४७ टक्के आहे.
राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात ७०.२१ लाख टन उसाचे गाळप तयार. ७ डिसेंबर २०२१ पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ७४.०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे, कोल्हापूर जिल्ह्यात साखर उतारा १०.५५ टक्के इतका आहे. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादनही कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे.
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ दिवस जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- हवामान अंदाज! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता
- आवास योजनांचे उद्दिष्ट ३१ मार्च पर्यंत पूर्ण करा – उदय सामंत
- उकडलेले अंडे खाणार्या ९९% लोकांना माहित नाही ही गोष्ट, जाणून घ्या
- सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार – अनिल परब