मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ८,९ जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. ८,९ जानेवारीला अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात ८,९ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस पडला. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तूर, कापूस, हळद, कांदा, गहू, भाजीपाला, हरभरा, संत्रा, केळी, पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्यामुळे तब्बल १४ हजार ८३० हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात चार तालुक्यांत ९६ गावांमध्ये १४ हजार ८३० हेक्टरवरील पीक नुकसानीची नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये 22 आणि 23 जानेवारीला अवकाळी पावसाची शक्यता
- रोज तुळशीची पाने दुधात उकळवून पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….
- सावधान! राज्यातील ‘या’ भागांमध्ये आज पावसासह गारपीट होण्याची शक्यता
- येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार – वर्षा गायकवाड यांची माहिती
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. २० जानेवारी २०२२
- पुन्हा पाऊस! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्यापासून दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज