देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; देशात गेल्या 24 तासात 58 हजार 97 कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई –  देशात कोरोनाचे (Corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना(Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

देशात मंगळवारी 37 हजार 379  कोरोना नवीन रुग्ण आढळले होते. तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona)  58 हजार 97 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या 24 तासात५३४ लोकांचा मृत्यू झाला.  गेल्या 24 तासात 15 हजार 389 रुग्ण कोरोनमुक्त आहे.  तसेच  3 कोटी 43 लाख 21 हजार 803  रुग्ण कोरोनामुक्त (Corona free) झाले आहेत. देशात आतापर्यंत  4 लाख 82 हजार 551 लोकांचा मृत्यू झाला आहे.  जीव गमावला संख्या आहे. देशात आतापर्यंत 145 कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे.

तर देशात तापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंटच्या 2135 रुग्णांची नोंद झाली आहे. देशात या व्हेरियंटचे 24 राज्यांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीमध्ये आहे.

महत्वाच्या बातम्या –