Acidity | ऍसिडिटी झाल्यावर लवंगाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Acidity | टीम कृषीनामा: आजकाल ऍसिडिटीची समस्या ही एक खूप सामान्य समस्या झाली आहे. कारण आजकाल बहुतांश लोकांना बाहेरचे तेलकट आणि मसालायुक्त पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे ऍसिडिटी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ऍसिडिटीमुळे पचनसंस्थेत अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर ऍसिडिटी झाल्यावर खूप अस्वस्थ वाटते. ऍसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. परंतु या औषधांचे सतत सेवन केल्याने आरोग्याला दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे ऍसिडिटीच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही मसाल्याच्या डब्यात उपलब्ध असलेल्या लवंगाचा (cloves) वापर करू शकतात. लवंग तुम्हाला ऍसिडिटीपासून मुक्त होण्यास मदत करू शकतो. ऍसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी लवंगाचा पुढील प्रमाणे वापर करता येऊ शकतो.

ऍसिडिटी (Acidity) च्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही जेवणामध्ये लवंगाचा समावेश करू शकतात. लवंगाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने ऍसिडिटीचा त्रास होत असेल, तर तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात एक लवंग आणि एक वेलची बारीक करून त्याचे सेवन करू शकतात. लवंगामध्ये कार्मिनेटिव गुणधर्म आढळून येतात, जे ऍसिडिटी कमी करण्यास मदत करतात.

ऍसिडिटीमध्ये लवंगाचा वापर कसा करायचा? (How to use cloves in acidity?)

  • ऍसिडिटी (Acidity) झाल्यास तुम्ही दोन-तीन लवंग खाऊ शकतात. तुम्ही चॉकलेटप्रमाणे लवंग हळूहळू चघळू शकतात. लवंगाच्या रसाने तुम्हाला काही मिनिटात आराम मिळू शकतो.
  • ऍसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक लवंग टाकून ते पाणी उकळून घेऊ शकतात. हे पाणी कोमट झाल्यावर तुम्ही त्याचे सेवन करू शकतात. लवंग पावडर गरम पाण्यात टाकून प्यायल्याने ऍसिडिटी (Acidity) च्या समस्येपासून आराम मिळू शकतो. यामध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अर्ध चमचा मध देखील मिसळू शकतात.
  • त्याचबरोबर ऍसिडिटीच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही एक लवंग, एक इलायची आणि चार तुळशीची पाने बारीक करून पाण्यात उकळून घेऊ शकतात. हे पाणी थोडे थंड झाल्यावर तुम्ही त्याचे चहाप्रमाणे सेवन करू शकतात. या पाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला ऍसिडिटी (Acidity) पासून आराम मिळू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Mahashivratri Diet | शरीरात दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी महाशिवरात्रीच्या उपवासात करा ‘या’ गोष्टींचे सेवन

PM Kisan Yojana | सरकारचं ठरलं! शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘या’ तारखेला येणार 13 वा हप्ता

Dry Throat | घसा पुन्हा-पुन्हा कोरडा होत असेल, तर करून बघा ‘हे’ घरगुती उपाय

Dark Spots | चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर करण्यासाठी कोरफडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care | फेशियल केल्यानंतर चेहऱ्यावरील चमक कायम ठेवण्यासाठी वापरा ‘या’ गोष्टी