Dry Throat | टीम कृषीनामा: घसा कोरडा होणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीला या समस्येला तोंड द्यावे लागते. यामुळे रात्री व्यवस्थित झोप लागत नाही. सर्दी, खोकला, बंद नाक या कारणांमुळे घसा कोरडा व्हायला लागतो. घसा कोरडा पडत असल्यामुळे श्वसनक्रियेत देखील व्यत्यय निर्माण होतो. त्यामुळे घशाची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कोरड्या घशासाठी काही उपाय सांगणार आहोत. घशाच्या संसर्गावर तुम्ही पुढील उपाय करू शकतात.
तुळशीचा काढा (Extract the basil-For Dry Throat)
तुमचा घसा जर सारखा कोरडा पडत असेल तर तुम्ही तुळशीच्या काढा पिऊ शकतात. तुळशीचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. घशाचा संसर्ग कमी झाल्यामुळे घसा कोरडा होणे थांबते. त्यामुळे तुम्ही जर कोरड्या गोष्टीच्या समस्येपासून त्रस्त असाल तर तुम्ही तुळशीचे सेवन करू शकतात.
ज्येष्ठमध (Elderberry-For Dry Throat)
घशाचा संसर्ग दूर करण्यासाठी जेष्ठमध फायदेशीर ठरू शकतो. त्याचबरोबर कोरड्या घशाच्या समस्येवर जेष्ठमध एक रामबाण उपाय आहे. यासाठी तुम्ही जेष्ठमधाचा एक छोटा तुकडा चघळू शकतात. ज्येष्ठमधाच्या एका छोट्या तुकड्याच्या सेवनाने घशातील वेदना आणि संसर्ग कमी होतो.
मध (Honey-For Dry Throat)
कोरड्या घशाच्या समस्येवर मध एक रामबाण उपाय आहे. यासाठी तुम्हाला कोमट पाण्यामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे लागेल. मधामध्ये अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे कशाचा संसर्ग दूर करण्यास मदत करतात. घशाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही रात्री मधाचे सेवन करू शकतात. रात्री मधाचे सेवन केल्याने कफाची समस्या देखील कमी होते.
घसा कोरडा पडत असेल तर तुम्ही वरील उपाय करू शकतात. त्याचबरोबर हाताच्या त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकतात
मोहरीचे तेल (Mustard oil-For Dry Skin)
मोहरीच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई आणि अँटीफंगल गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे हातांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हाताला मोहरीच्या तेलाने मालिश करू शकतात. त्याचबरोबर अंघोळ करण्यापूर्वी तुम्ही मोहरीच्या तेलाने हाताची मालिश करू शकतात. मोहरीच्या तेलाने हाताच्या त्वचेवरील कोरडेपणा दूर होऊ शकते.
मध (Honey-For Dry Skin)
हाताच्या कोरड्या त्वचेपासून सुटका मिळायची असेल तर मध तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मधामध्ये नैसर्गिक मैश्चरायझर आढळून येते. त्याचबरोबर मधामध्ये माफक प्रमाणात विटामिन बी आणि सी आढळून येते. हे दोन्ही जीवनसत्व त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे हातावरील कोरडेपणाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हातावर मध लावून मसाज करू शकतात. साधारण तीस मिनिटं तुम्हाला हातावर मध लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा हात स्वच्छ धुवावा लागेल.
दही (Curd-For Dry Skin)
कोरड्या त्वचेच्या समस्येवर दही एक रामबाण उपाय ठरू शकतो. दह्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे त्याच्या मदतीने कोरडी त्वचा दूर होऊ शकते. यासाठी तुम्हाला दह्यामध्ये मध आणि साखर मिसळून घ्यावी लागेल. या मिश्रणाने तुम्हाला पाच मिनिटे हातावर मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे हात स्वच्छ पाण्याने धुवावे लागतील. हे मिश्रण धुतल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातावर तुमची नियमित क्रीम लावावी लागेल.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या